शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

परवाना नूतनीकरणाची मुदत वाढवून मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:24 IST

कोल्हापूर : आस्थापनांना परवाना नूतनीकरण करुन घेण्याची मुदत दिनांक ३० एप्रिलपर्यंत आहे. सध्या ९० टक्के आस्थापना बंद आहेत. त्यामुळे ...

कोल्हापूर : आस्थापनांना परवाना नूतनीकरण करुन घेण्याची मुदत दिनांक ३० एप्रिलपर्यंत आहे. सध्या ९० टक्के आस्थापना बंद आहेत. त्यामुळे परवाना नूतनीकरण करुन घेणे शक्य नाही. त्यामुळे परवाना नूतनीकरणाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे गुरूवारी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील ‘ब्रेक द चेन’मुळे सध्या शहरातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सोडून सर्व उद्योजक, व्यापाऱ्यांचे दैनंदिन व्यवहार पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे परवाना नूतनीकरण करणे शक्य नाही. परवाना नूतनीकरण मुदत संपल्यानंतर १५ टक्के आणि २० टक्के दंड आकारला जाईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाने सर्व व्यवसाय व उद्योग बंद असल्याने कोणताही दंड आकारण्यात येवू नये, अशी मागणी या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, खजानिस हरीभाई पटेल, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडीया, संचालक प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, अजित कोठारी, आदी उपस्थित होते.

चौकट

अन्यथा, फायरसेस भरणार नाही

महापालिकेने व्यापारी, उद्योजकांना विश्वासात न घेता, चुकीच्या पद्धतीने फायरसेसमध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. ही वाढ चुकीची असल्याने ती तत्काळ मागे घ्यावी. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत व्यापारी, उद्योजक फायरसेस भरणार नाहीत, असे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

फोटो (२२०४२०२१-कोल-चेंबर ऑफ कॉमर्स) : कोल्हापुरात गुरूवारी परवाना नूतनीकरण, फायरसेसबाबतच्या मागणीचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांना दिले. यावेळी संजय पाटील, हरीभाई पटेल, आदी उपस्थित होते.

===Photopath===

220421\22kol_1_22042021_5.jpg

===Caption===

फोटो (२२०४२०२१-कोल-चेंबर ऑफ कॉमर्स) : कोल्हापुरात गुरूवारी परवाना नूतनीकरण, फायरसेसबाबतच्या मागणीचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांना दिले. यावेळी शेजारी संजय पाटील, हरीभाई पटेल, आदी उपस्थित होते.