शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठात उत्साहात निघाली ग्रंथदिंडी, वाचनसंस्कृतीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:13 IST

विविध विषयांवर प्रबोधन करणारी पथनाट्य, संदेश फलक आणि पारंपारिक वाद्यांचा गजर, विद्यार्थी-विद्यार्थीनींचा उर्त्स्फूत सहभाग अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ग्रंथदिंडी पार पडली. या दिंडीतून वाचनसंस्कृतीचा जागर करण्यात आला.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात उत्साहात निघाली ग्रंथदिंडी. वाचनसंस्कृतीचा जागरविद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजन

कोल्हापूर : विविध विषयांवर प्रबोधन करणारी पथनाट्य, संदेश फलक आणि पारंपारिक वाद्यांचा गजर, विद्यार्थी-विद्यार्थीनींचा उर्त्स्फूत सहभाग अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ग्रंथदिंडी पार पडली. या दिंडीतून वाचनसंस्कृतीचा जागर करण्यात आला.

या दिंडीने विद्यापीठाच्या ५५ व्या दीक्षान्त समारंभाचा प्रारंभ झाला. कमला महाविद्यालय येथे सकाळी साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि ताराराणी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उदघाटन झाले.

फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये ग्रंथांची मांडणी केली होती. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘शहीद जवान अमर रहे’, अशा घोषणा देत ग्रंथदिंडी पुढे सरकत राहिली. विद्यार्थी-विद्यार्थीनींनी ‘वाचनबुद्धीचे खाद्य’, ‘वाचाल, तर वाचाल’, अशा विविध संदेश फलकांच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीचा जागर केला. विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी गांधी टोप्या परिधान करून सहभागी झाले होते.

राजारामपुरी मेन रोड, माऊली चौक, सायबर चौक, दूरशिक्षण केंद्र मार्गे आलेल्या ग्रंथदिंडीचा लोककला केंद्राच्या परिसरात समारोप झाला. दिंडीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, नमिता खोत, डी. के. गायकवाड, ए. एम. गुरव, पी. डी. राऊत, अमित कुलकर्णी, आर. जी. कोरबू, एस. व्ही. थोरात, डी. बी. सुतार, एस. आर. लिहितकर, आदी सहभागी झाले.

पथनाट्यातून प्रबोधनया दिंडीमध्ये शहाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘क्षयरोग एक भयानक वास्तव’ याविषयावरील, तर कमला महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी ‘स्त्री भ्रूण हत्या’ रोखण्याबाबत प्रबोधन करणारे पथनाट्य सादर केले. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांचा गजर करत चैतन्य निर्माण केले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर