कोल्हापूर : जिल्हयातील महत्त्वाच्या बाजारपेठांतील व्यापार, दुकाने सुरू करण्यासंबंधी विविध व्यापारी संघटनांकडून आलेल्या मागणीचे अवलोकन करावे, असे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना पाठविले आहे. यावर सचिवांकडून काय उत्तर येते, यासंंबंधी व्यापाऱ्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
जिल्हा प्रशासनाने काढलेल्या नव्या आदेशानुसार सोमवारपासून अत्यावश्यक सेवा, सुविधांची दुकानेच सुरू करण्यास परवानगी आहे. सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. यामुळे शहरातील व्यापारी, दुकानदारांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. शहरासह जिल्हयातील सर्वच प्रमुख बाजारपेठेतील सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चरल आणि विविध व्यापारी संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जिल्हा प्रशासनाने सचिवांकडे परवानगीसंबंधी पत्र पाठवले आहे.