शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

शाश्वत विकासासाठी समर्पित, कल्पक उत्तरे शोधूया : ई. रवींद्रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 21:07 IST

शाश्वत विकास हा आता फक्त मानवी गरजांपुरता नाही. त्यासाठी सर्व विद्यमान पर्यावरण घटकांचा एकत्र विचार करून सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्दे शाश्वत विकासासाठी समर्पित, कल्पक उत्तरे शोधूया : ई. रवींद्रन ‘सायबर’मधील पर्यावरणविषयक परिषद

कोल्हापूर : शाश्वत विकास हा आता फक्त मानवी गरजांपुरता नाही. त्यासाठी सर्व विद्यमान पर्यावरण घटकांचा एकत्र विचार करून सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी शुक्रवारी येथे केले.येथील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अ‍ॅँड रिसर्च सेंटर (सायबर) मध्ये पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्यातर्फे आयोजित एकदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेचा विषय ‘शाश्वत विकास : २१व्या शतकाची उद्दिष्टे ’ असा होता. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय अधिकारी प्रशांत गायकवाड प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमास सायबरचे माजी संचालक डॉ. व्ही. एम. हिलगे, संचालक डॉ. प्रदीप वायचळ, शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. व्ही. बी. ककडे, रवींद्र आंधळे, एन. एम. गुरव, वाय. बी. सोनटक्के, पी. एम. रोहाना, उल्हास परळीकर, राजेंद्र पोंडे, हेमंत शहा उपस्थित होते. डॉ. एस. डी. कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. एस. माळी यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर