शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ कोल्हापूर सर्किट बेंचबाबत पत्र देऊ : चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:43 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा शपथविधी झाल्यानंतर केवळ कोल्हापूर सर्किट बेंचबाबत पत्र देऊ, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात दिले.

ठळक मुद्दे केवळ कोल्हापूर सर्किट बेंचबाबत पत्र देऊ  : चंद्रकांत पाटील वकिलांसह खंडपीठ नागरी कृती समितीची भेट

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा शपथविधी झाल्यानंतर केवळ कोल्हापूर सर्किट बेंचबाबत पत्र देऊ, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात दिले.महापौर शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथे खंडपीठ कृती समिती व सर्वपक्षीय खंडपीठ नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, खंडपीठ नागरी कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार, खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, आदी उपस्थित होते.चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांचा शपथविधी होणार आहे. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर तत्काळ कोल्हापूर सर्किट बेंचबाबत पत्र देऊ तसेच निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपलब्ध आहे. त्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही. तो तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल व जागेचाही प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल.यावेळी अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नरेश पाटील यांच्या नावाची शिफारस झाल्याची बाब स्पष्ट केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर सर्किट बेंच स्थापनेबाबत मुख्य न्यायाधीशांना सत्वर पत्र द्यावे तसेच ठोक निधीची तरतूद करावी. जागेचा प्रश्न मार्गी लावावा, अशा विनंतीचे निवेदन पालकमंत्री पाटील यांना दिले. प्रतापसिंह जाधव यांनी पालकमंत्री यांच्याकडे सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी भूमिका मांडली.खंडपीठ नागरी कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले. ज्येष्ठ वकील अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी या संदर्भातील पूर्वीच्या बैठकीमध्ये झालेल्या बाबींचा ऊहापोह केला.

यावेळी खंडपीठ नागरी कृती समितीचे बाबा पार्टे, प्रसाद जाधव, दीपा पाटील, प्रा. जयंत पाटील, राजू लिंग्रस, सुभाष जाधव, अ‍ॅड. बाबा इंदूलकर तसेच अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. शिवाजीराव राणे व बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आनंदराव जाधव, सेक्रेटरी अ‍ॅड. सुशांत गुडाळकर, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Courtन्यायालयChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर