शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांची सोईच्या ‘एस.टी.’कडे पाठ, अपघाताला निमंत्रण : २५ गाड्या एमआयडीसीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 12:12 IST

ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला रोजगारासाठी ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे आणि वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना नाइलाजास्तव अवैध खासगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने कामगारांच्या सोईसाठी त्यांच्या गावांतून एम.आय.डी.सी.पर्यंत एस.टी.ची विशेष सोय केली आहे. मात्र याकडे कामगारांचे दुर्लक्ष करून अशा धोकादायक वाहतुकीद्वारे प्रवास करीत असल्याने पुन्हा एकदा अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.

ठळक मुद्देकामगारांची सोईच्या ‘एस.टी.’कडे पाठअपघाताला निमंत्रण : २५ गाड्या एमआयडीसीसाठी

प्रदीप शिंदेकोल्हापूर : ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला रोजगारासाठी ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे आणि वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना नाइलाजास्तव अवैध खासगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने कामगारांच्या सोईसाठी त्यांच्या गावांतून एम.आय.डी.सी.पर्यंत एस.टी.ची विशेष सोय केली आहे. मात्र याकडे कामगारांचे दुर्लक्ष करून अशा धोकादायक वाहतुकीद्वारे प्रवास करीत असल्याने पुन्हा एकदा अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.जिल्ह्यामध्ये गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित, शिरोली या औद्योगिक वसाहतींमध्ये ग्रामीण भागातील कामगार मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी येतात. त्यांपैकी काहीजण दुचाकीवरून प्रवास करतात; पण ज्यांच्याकडे दुचाकी नाही, त्या कामगारांना व्हॅन, अ‍ॅपे रिक्षा, रिक्षा, जीप यांतून प्रवास करावा लागतो आहे.

हे वाहनधारक जास्त पैसे मिळविण्याच्या उद्देशाने प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून जादा फेऱ्या करण्यासाठी वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे या मार्गावर अपघातांमध्ये वाढ झाल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळते. रात्री-अपरात्री दुचाकीवरून प्रवास करताना कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.कामगार प्रवाशांच्या मागणीनुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे कामगारांच्या सोईसाठी गावातून एस. टी. उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गोकुळ शिरगाव, शिरोली, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालते. त्यानुसार आता एस. टी. गाड्या सोडण्याचे व कामगारांना ने-आण करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे कामगारांचा प्रवास सुखकारक आणि सुरक्षित होणार आहे.कोल्हापूर विभागातर्फे २५ गाड्याएमआयडीसीला जाणाऱ्या कामगारांसाठी कोल्हापूर विभागाच्या वतीने २५ गाड्यांची सोय करण्यात आली आहे. तीन शिफ्टमध्ये ७५ फेऱ्यांची सोय केली आहे. यामध्ये कोल्हापूर आगारामधून ०२, संभाजीनगर ०२, गडहिंग्लज ०४, गारगोटी : ०३, कागल : १०, राधानगरी : ०४ या मार्गांवर गावातून गाडीची सोय केली आहे. मात्र प्रवासी याकडे पाठ फिरवीत आहेत.

अवैध प्रवासातील धोके समोर आल्याने कामगारांच्या मागणीनुसार त्यांच्या गावातून एमआयडीसीपर्यंत जाण्यासाठी तीन शिफ्टमध्ये एस.टी.ची सोय केली आहे. यासाठी कामगारांना सवलतीचा प्रवासी पास दिला जातो. मात्र बहुतांश कर्मचारी हे एस.टी. बसची सेवा सुरक्षित असतानाही तिचा लाभ घेत नाहीत.- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग

उत्पन्न वाढविण्यासाठी खासगी वाहनेआर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने एमआयडीसीमधील काही कर्मचाºयांनी प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहने घेतली आहेत. यामधून ते इतर कर्मचाऱ्यांना घेऊन जातात. एमआयडीसीमध्ये श्रमाचे काम, कामावर वेळेत पोहोचण्याच्या उद्देशाने अनियंत्रित वेगाने गाडी चालविल्याने डोळ्यांवर झापड येतेच; त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अपघातामुळे एक व्यक्ती नव्हे तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूर