कोल्हापूर : शिरोली सादळे (ता. करवीर) येथे मंगळवारी (दि. ६) रात्री साडेनऊच्या सुमारास मुख्य रस्त्यावरच सिद्धेश्वर नाष्टा सेंटर येथे बिबट्या ठिय्या मारून बसला होता. बिबट्याला पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या आहे त्या ठिकाणी थांबल्या. स्थानिक नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्या क्रश बॅरिअरवरून उडी मारून शिये-जठारवाडीच्या दिशेने झाडीत निघून गेला. या ठिकाणी वनविभागाने रात्रीच भेट दिली.सादळेमादळे, गिरोली, जोतिबा, दानेवाडी, पन्हाळगडापर्यंत घनदाट झाडी आणि जंगल आहे. हा बिबट्या पन्हाळगडावरून भक्ष्याच्या शोधात फिरत सादळेमादळे येथील सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात आला असावा, असा अंदाज वनविभागाचे प्रदीप सुतार यांनी बांधला.सादळे गावाच्या सुरुवातीलाच डोंगरावरून उतरून सिद्धेश्वर नाष्टा सेंटरसमोर मुख्य रस्त्यावरच बिबट्या ठिय्या मारून बसला होता. स्थानिक नागरिकांनी बिबट्या बघितल्यावर घबराटीचे वातावरण पसरले. गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन बॅटरीच्या साहाय्याने बिबट्याच्या दिशेने जाऊन आरडाओरड केल्यावर बिबट्याने शिये-जठारवाडीच्या दिशेने धूम ठोकली. बिबट्या शिये-जठारवाडीच्या धाकोबा मंदिराच्या परिसरात तो निघून गेला.सादळे-मादळे, गिरोलीपर्यंत दक्षिण बाजूस वनक्षेत्र असल्याने हिरवीगार झाडी आहे. या ठिकाणी ससा, भेकर, लांडगा, कोल्हा, तरस, हरीण असे प्राणी वरचेवर नजरेस पडतात. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्या वावरत असल्याची चर्चा होती.वनविभागाचे अधिकारी प्रदीप सुतार,अनिल कुंभार, विनायक माळी यांनी जागेवर येऊन पाहणी केली व बिबट्या असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शेतावर जाताना किंवा बाहेर जाताना एकट्याने न जाता गटगटाने जावे. काही दिवस सावधानता बाळगावी. बिबट्यासारखा प्राणी अशा ठिकाणी शक्यतो जास्त काळ थांबत नाही. तो पुन्हा पन्हाळ्याचे दिशेने परत जाईल, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले.
सादळेमादळे रस्त्यावर बिबट्याचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 13:34 IST
leopard, kolhapurnews, forestdepartment sadlemadle शिरोली सादळे (ता. करवीर) येथे मंगळवारी (दि. ६) रात्री साडेनऊच्या सुमारास मुख्य रस्त्यावरच सिद्धेश्वर नाष्टा सेंटर येथे बिबट्या ठिय्या मारून बसला होता. बिबट्याला पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या आहे त्या ठिकाणी थांबल्या. स्थानिक नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्या क्रश बॅरिअरवरून उडी मारून शिये-जठारवाडीच्या दिशेने झाडीत निघून गेला. या ठिकाणी वनविभागाने रात्रीच भेट दिली.
सादळेमादळे रस्त्यावर बिबट्याचा ठिय्या
ठळक मुद्देसादळेमादळे रस्त्यावर बिबट्याचा ठिय्यावनविभागाने रात्रीच दिली भेट