शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राखण करायला गेले गव्यांची अन् समोर आला बिबट्या, शेतकऱ्यांची उडाली भांबेरी; पश्चिम पन्हाळा परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 16:31 IST

बाजारभोगाव : गव्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शिवाराची राखण करायला गेले असता अचानक बिबट्या समोर आल्याने शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली. ...

बाजारभोगाव : गव्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शिवाराची राखण करायला गेले असता अचानक बिबट्या समोर आल्याने शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली. पन्हाळा पश्चिम परिसरातील पिसात्री येथे वनखात्याच्या जंगलानजिक असलेल्या खीरसागर नावाच्या शेतात काल, शुक्रवारी (दि.२५) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळ पन्हाळा परिसरात शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.याबाबत माहिती अशी की, पिसात्री येथील नाथा भाऊ पाटील व पांडूरंग पाटील हे शेतकरी नेहमी प्रमाणे खीरसागर नावाच्या ऊस शेतीचे राखण करणेसाठी गेले होते. दुचाकी थांबवून दोघेही शेताकडे जात असताना बॕटरी प्रकाश मात्रातच अचानक बिबट्या समोर आला. त्यामुळे या दोघां शेतकऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.प्रसंगावधान राखत त्यांनी बॕटरी बंद केली. यावेळी दोघेही हळुवार शेतात राखणेसाठी तयार केलेल्या माचावर जावून बसले व फोन करुन घरच्यांना याबाबत माहिती दिली. भितीपोटी राखण सोडून सर्वांनी घरचा रस्ता धरला. काही दिवसापुर्वी या परिसरातील रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले होते. यानंतर आज पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.पन्हाळा पश्चिम भागात गव्यांचा वावरपन्हाळा पश्चिम भागात गव्याचा मोठा उपद्रव आहे. शेतात शिरुन गव्याचे कळप मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करत आहेत. त्यामूळे सर्व शेतकरी शेताची राखण करणेसाठी शेतात जातात. मात्र गव्यांची राखण करताना वाघ दिसल्याने शेतकरी वर्ग भितीच्या छायेखाली आहे . 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या