शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

विधान परिषद निवडणूक : महादेवराव महाडिकही झाले होते बिनविरोध, आतापर्यंत काँग्रेसचीच विजयी पताका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 12:35 IST

विधान परिषदेचा हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून एकूण नऊ निवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी पाच वेळा त्या बिनविरोध झाल्या व चार वेळा प्रत्यक्ष निवडणूक झाली आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक शुक्रवारी बिनविरोध झाली. काँग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांना दुसऱ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक हे देखील यापूर्वी काँग्रेसच्याच चिन्हांवर २००३ मध्ये बिनविरोध निवडून आले होते. फक्त या दोन्ही निवडणुकीतील फरक इतकाच आहे, की महाडिक यांच्या विरोधात विरोधक प्रबळ नव्हता व या निवडणुकीत तो प्रबळ असतानाही ती बिनविरोध होत आहे हेच त्यातील विशेष म्हणावे लागेल. आणखी एक विशेष म्हणजे आतापर्यंत काँग्रेसचाच उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाला आहे.

विधान परिषदेचा हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून एकूण नऊ निवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी पाच वेळा त्या बिनविरोध झाल्या व चार वेळा प्रत्यक्ष निवडणूक झाली आहे. मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर पहिल्या दोन टर्मला काँग्रेसचे सदाशिवराव शिंदे हे बिनविरोध निवडून आले. त्या वेळी कोल्हापूर-सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संघ असा एकत्रित मतदारसंघ होता. वसंतदादा पाटील यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांचे राहणीमान एकदम साधे होते. आमदार म्हणून त्यांनी कधीच रुबाब मिरवला नाही. उत्तरेश्वर पेठेतील राजमाता गर्ल्स हायस्कूलजवळ ते भाड्याच्या घरात राहत होते. मेजर (निवृत्त) संजय शिंदे यांचे ते वडील होत. त्यांच्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबूराव धारवाडे यांची बिनविरोध निवड झाली. समाजासाठी धडपड करणारा कार्यकर्ता म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी धारवाडे यांना संधी दिली.त्यांच्यानंतर इचलकरंजीतील काँग्रेसचे कार्यकर्ते अशोकराव जांभळे यांनी १९९१ ला निवडणूक लढवली. बाळासाहेब माने यांचे ते कार्यकर्ते. या लढतीत त्यांना १४७ मते पडली. जनता पक्षाचे मनोहर माने यांना ५० हून अधिक मते मिळाली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सदस्य मतदार नव्हते. त्यामुळे मतदारसंख्या मर्यादित होती. म्हणजे साधारणत: १९९१ पर्यंत या मतदारसंघाकडे फारसे कुणाचे लक्ष नव्हते. त्याचा आमदार असतो हे देखील कुणाला माहीत नसायचे. महादेवराव महाडिक यांनी या निवडणुकीत शड्डू ठोकल्यापासून या लढतीला महत्त्व प्राप्त झाले. त्यांनी १९९७ च्या लढतीत काँग्रेसचे मतदान जास्त असूनही आर्थिक ताकद, राजकीय वर्चस्वाचा वापर करून ही जागा जिंकली होती. हाच फाॅर्म्युला मागील दोन निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनीही वापरला व ही जागा आपल्याकडे खेचून घेतली.

शिंदे यांचे साधेपणा..

- या मतदारसंघाचे पहिले आमदार सदाशिवराव शिंदे यांनी विडी कामगारांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्यासाठी प्रयत्न केले.- शेका पक्षाचे आमदार त्र्यं. सि. कारखानीस यांच्या साधेपणाचा किमान गवगवा तरी झाला, परंतु शिंदे हे देखील तितकेच साधे सरळ आयुष्य जगले. परंतु ते कोल्हापूरच्या विस्मृतीत गेले.

अशा झाल्या यापूर्वीच्या पाच लढती..

- वर्ष १९९७ (एकूण मते ३५१)

आमदार महादेवराव महाडिक अपक्ष- २२२

वडगांवचे तत्कालीन नगराध्यक्ष विजयसिंह यादव (काँग्रेस)-१२९

महाडिक हे ९३ मतांनी विजयी.

वर्ष २००३ : काँग्रेसचे उमेदवार म्हणून महादेवराव महाडिक बिनविरोध विजयी (तत्कालीन माजी महापौर बाबू हारूण फरास यांची अचानक माघार)

वर्ष २००९ : (एकूण मते ३८३)

काँग्रेसचे उमेदवार महादेवराव महाडिक-२९२

जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रा.जयंत पाटील-१७१

(महाडिक ४१ मतांनी विजयी, मताधिक्क्य निम्म्यावर)

वर्ष २०१५ (एकूण मते ३८२)

काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील २२०

महादेवराव महाडिक (भाजप पुरस्कृत) १५७

बाद - ०५

काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील ६३ मतांनी विजयी.

वर्ष २०२१ (एकूण मते ४१५)

काँग्रेसचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील बिनविरोध विजयी

भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी राज्यस्तरीय निर्णयानुसार घेतली माघार.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिकcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील