शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणूक : अर्ज माघारीनंतर अमल महाडिक म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 17:15 IST

अर्ज माघारीनंतर अमल महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपले मत मांडले आहे. पक्षाआदेशावरून निवडणूक लढवत होतो आणि पक्षाच्या आदेशावरून थांबतोय असे त्यांनी या पत्रकातून म्हटले आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागेसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला होता. यासाठी १० डिसेंबरला मतदान होणार होते. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षानी तसेच विरोधी भाजपनेही या निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. यातच गेल्या दोन दिवसापासून ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेला ऊत आला. त्यातच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील दिल्लीत गेल्याने या चर्चेला आणखी जोर चढला होता. या सर्व चर्चा आज खऱ्या ठरल्या.काँग्रेस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले. यात कोल्हापूरच्या जागेचाही समावेश होता. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सर्वाच्या नजरा अर्ज माघारीकडे लागून राहिल्या होत्या. अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी धनंजय महाडिक यांना फोन करुन अमल व शौमिका महाडिक यांचा अर्ज माघारी घेण्याची सूचना केली. यानंतर लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयात जात अमल महाडिक यांनी आपला अर्ज माघारी घेतला. यामुळे महाविकास आघाडीचे व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतेज पाटील यांची आमदारपदी बिनविरोध निवड झाली.अर्ज माघारीनंतर अमल महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपले मत मांडले आहे. पक्षाआदेशावरून निवडणूक लढवत होतो आणि पक्षाच्या आदेशावरून थांबतोय असे त्यांनी या पत्रकातून म्हटले आहे.या पत्रात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षं महाडिक साहेबांनी या जागेवर विधान परिषदेत प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे यंदाही तोडीस तोड म्हणून महाडिक कुटुंबातीलच उमेदवार असावा अशी पक्षाची आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार पक्षाकडून मला उमेदवारी दिली गेली. त्या अनुषंगाने आम्ही तयारीलाही लागलो होतो. पण आज अचानक दिल्लीतुन वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर विधानपरिषदेच्या जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.. आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार मी आज माझा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा झाल्यापासून माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले माझे मोठे बंधू धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, जयंत पाटील सर तसेच सर्व ज्ञात-अज्ञात नेते, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, माझ्या पक्षातील सर्व सहकारी मित्र, कुटुंबातील सर्व सदस्य व जीवापाड प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानतो.कोल्हापूरच्या जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर होतो व यापुढेही असेनच. त्यामुळे माझ्यावर, माझ्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी संयम राखून पक्षादेशाचा मान राखावा, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmal Mahadikअमल महाडिकVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक