शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर

By admin | Updated: April 29, 2016 00:54 IST

पाणीपुरवठा बंदचा पहिला दिवस : शहरात २७ टँकरद्वारे दिवसभर ४५ फेऱ्या; काम संपण्यास उजाडणार शनिवारची पहाट

कोल्हापूर : शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या गळती काढण्याचे काम गुरुवारी सकाळपासून युद्धपातळीवर सुरू झाले. तब्बल चार ठिकाणच्या मोठ्या स्वरूपाच्या गळती काढण्यात येत असल्याने हे काम पूर्ण होण्यास शनिवारची पहाट उजडणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिंगणापूर योजनेवर अवलंबून असलेल्या शहरातील निम्म्याहून अधिक भागास टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेवून कोल्हापूर शहरात सध्या एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्यातच शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीची चार ठिकाणी असलेली गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आल्याने शहराच्या निम्म्याहून अधिक भागातील पाणीपुरवठा खंडित करावा लागला आहे. त्यामुळे शहरात पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. शहर पाणीपुरवठा विभागाने केलेल्या नियोजनानुसार गळती काढण्याचे काम सुरू झाले असून निर्धारित वेळेत ते पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.सकाळी सहा वाजता शिंगणापूरहून पुईखडीला नेण्यात येणाऱ्या पाण्याचा उपसा बंद केला. जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह रिकामे करण्यात आले. त्यानंतर जलवाहिनीतील पाणी बाहेर काढण्यास पहिल्याच दिवशी थोडा विलंब झाला. ज्या ठिकाणी गळती आहे, तेथील जलवाहिनीतून अक्षरश: कारंजासारखे पाणी उडत होते. खुदाई करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले. खड्ड्यात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या मोटारी बसवून पाणी बाहेर काढावे लागले. जलवाहिनीतील तसेच खुदाई केलेल्या खड्ड्यातील पाणी बाहेर काढण्यात दुपारपर्यंतचा वेळ गेला. त्यानंतर काम सुरु झाले.गळक्या जलवाहिनी काढण्यासाठी चिवा बाजार येथे एक किलोमीटरची तर अयोध्या पार्क येथील पाचशे मीटरची जलवहिनी आधीच टाकण्यात आलेली आहे. फक्त त्याला क्रॉस कनेक्शन जोडण्यात येणार आहे. फुलेवाडी जकात नाका, अयोध्या पार्क, ए वन गॅरेज व चिवा बाजार अशा चार ठिकाणची ही गळती काढली जात आहे. चारही ठिकाणी जेसीबी, के्रन, पोकलॅँड, वेल्डिंग मशिन्स, गॅस कटर, जनरेटर सेट अशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून एकूण साठ ते सत्तर कर्मचारी प्रत्यक्ष काम करत आहेत. हे काम अव्याहतपणे सुरू राहणार आहे. त्यासाठी रात्रीच्या उजेडासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनपाचे जलअभियंता मनिष पवार, उपजलअभियंता प्रभाकर गायकवाड, शाखा अभियंता बी. एम. कुंभार आदी जातीने कामावर लक्ष ठेऊन आहेत. सायंकाळी महापौर अश्विनी रामाणे, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादी गटनेते सुनील पाटील यांच्यासह नगरसेविका वनिता देठे, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम, माजी नरगसेवक मधुकर रामाणे, दुर्वास कदम आदींनी गळती काढण्याची कामाची चारही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनिष पवार आदी उपस्थित होते.टँकरने पाणीपुरवठा सुरूजलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला असल्याने पाणीपुरवठ्याची पर्यायी सोय म्हणून टँकरची सोय करण्यात आली आहे. शहरात भाड्याने घेतलेले १९ टँकर आणि महापालिकेचे आठ अशा एकूण २७ टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात या टँकरनी ४५ फेऱ्या केल्या आहेत. गुरुवारी पाण्याची टंचाई जास्त जाणवली नाही, परंतु आज, शुक्रवारपासून तीव्रता जाणवणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने गुरुवारपासून शहरातील चार महत्त्वाच्या ठीकाणी गळती काढण्याचे काम हाती घेतले. १) अयोध्या पार्क येथील गळती काढताना खड्ड्यात पाणी साठल्याने कामगारांना कसरत करावी लागली. २) फुलेवाडी जकात नाक्याजवळ गळती काढण्याचे सुरू असलेले काम ३) रिंगरोडवरील चिव्यांचा बाजार येथील गळती काढण्याचे काम सुरू असताना महापौर अश्विनी रामाणे, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, उपायुक्त विजय खोराटे, शारंगधर देशमुख, मनीष पवार, सुनील पाटील, आदींनी कामाच्या ठिकाणी पाहणी केली.