शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
2
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
3
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
4
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
5
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
6
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
7
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
10
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
11
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
12
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
13
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
14
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
15
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
17
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
18
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
19
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
20
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार

Kolhapur- Politics of Gokul: महायुतीत नेते २३ अन् जागा २१; ठराव किती, यावरच उमेदवारी

By राजाराम लोंढे | Updated: June 23, 2025 12:54 IST

पॅनेल बांधणीची कसरत, नेत्यांची डोकेदुखी ठरणार

राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीत महायुतीच्या नेत्यांना यश आल्याने आगामी निवडणुकीसाठी एक भक्कम मोट बांधण्याचा प्रयत्न असला, तरी उमेदवारीचे वाटप नेत्यांची डोकेदुखी ठरणार, हे निश्चित आहे. महायुतीमध्येगोकुळ’शी संलग्न नेते २३ आहेत आणि जागा २१ आहेत. कोणाकडे किती ठराव आहेत, यावरच उमेदवारी निश्चित होणार असली, तरी त्याला बहुमताचे पक्षीय राजकारण आडवे येऊ शकते.

गेल्या चार वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक हे ‘गोकुळ’च्या राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले होते. त्यातच पी. एन. पाटील यांच्या निधनाने विरोधी पॅनेल कसे होईल? याबाबत चर्चा सुरू होती. पण, अध्यक्ष निवडीतून ‘गोकुळ’च्या राजकारणाला कलाटणी मिळाली. त्यात महादेवराव महाडीक यांनी समविचारी नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. महायुती म्हणून एकसंध राहून जिल्ह्याचे प्रमुख सत्ता केंद्र ताब्यात घेण्याची व्यूहरचना नेत्यांची आहे. पण, उमेदवारीसाठी नेत्यांसह त्यांचे राजकीय वारसदारच इच्छुक आहेत. त्यामुळे, नेत्यांच्या संख्येवरून जरी महायुती भक्कम वाटत असली, तरी उमेदवारीवरून होणारी नाराजी, त्यातून एकमेकाचे उट्टे काढण्याचे प्रकार होणार आहेत. महाविकास आघाडीनेही जोडण्या सुरू केल्या असून, त्यांची भिस्त करवीर, गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, आजरा, पन्हाळा तालुक्यांवर आहे.पारंपरिक विरोधकांचे काय?कागल, हातकणंगले, शिरोळ, करवीर वगळता एकमेकांचे पारंपरिक विरोधक महायुतीमध्ये एकत्र येणार आहेत. त्यांच्या ताकदीनुसार उमेदवारीही मिळेल, पण अंतर्गत कुरघोड्या घातक ठरू शकतात.

दीडशे ठरावाला उमेदवारी‘गोकुळ’चे ५४७० संस्था मतदानास पात्र आहेत. विजयासाठी पॅनेलकडे किमान ३ हजार ठराव हवेत. त्यामुळे ज्याच्याकडे किमान दीडशे ठराव आहेत, त्यांनाच उमेदवारी असे गणित पुढे येऊ शकते.

‘करवीर’मध्ये गणित कसे जुळणार?संघात सर्वाधिक ८६८ ठराव हे करवीर तालुक्यातील आहेत. येथे आमदार चंद्रदीप नरके व आमदार अमल महाडिक हे महायुतीचे नेते ताकदवान आहेत. पण, ठरावाची गोळाबेरीज पाहिली, तर येथे महाविकास आघाडी वरचढ ठरते. त्यामुळे येथे आघाडीतील एखाद्या नेत्याला सोबत घेऊन भरपाई करण्याची चाचपणी सुरू आहे.‘शाहू आघाडी’ एकसंध ठेवण्याचे प्रयत्नराजकीय हस्तक्षेपामुळे अध्यक्ष निवडीत उलथापालथ झाली असली, तरी आगामी निवडणूक राजर्षी शाहू आघाडी म्हणूनच लढू या, अशा अंतर्गत हालचाली सुरू आहेत. त्यासाठी ज्येष्ठ संचालकांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

तालुकानिहाय ‘गोकुळ’चे सभासद

  • करवीर - ८६८
  • राधानगरी - ७०३
  • कागल - ६२२
  • भुदरगड - ५९८
  • पन्हाळा - ५१९
  • शाहूवाडी - ४५१
  • चंदगड - ४२६
  • गडहिंग्लज - ४०२
  • आजरा - ३०८
  • शिरोळ - २७४
  • हातकणंगले - १६७
  • गगनबावडा - १३२