महाराष्ट्र गुंड, भूमाफिया, खंडणीबहाद्दरांचे राज्य बनले; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 02:23 PM2024-02-08T14:23:13+5:302024-02-08T14:27:04+5:30

शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

Leader of Opposition Ambadas Danve criticized the state government | महाराष्ट्र गुंड, भूमाफिया, खंडणीबहाद्दरांचे राज्य बनले; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र गुंड, भूमाफिया, खंडणीबहाद्दरांचे राज्य बनले; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

कोल्हापूर-शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, राज्यात सध्या सुरू असलेल्या गुंडगीरीवरुन दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आज दानवे यांनी घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

PM मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म तर...; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ

"आज आम्ही जनता दरबार घेणार आहे. सरकारी यंत्रणा वापरुन शासन आपल्या दरबारी हा कार्यक्रम म्हणजे फक्त शो बाजी आहे. सरकारी दरबारी लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. शासन आपल्या दरबारी हा फक्त फार्स आहे.  मंत्रालयात जाऊन बघा लोकांची गर्दी किती आहे, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.राष्ट्रवादी कोणाची आहे हे विचारल्यावर कोणही सांगेत शरद पवारांची आहे, काल आलेला निकाल म्हणजे मॅच फिक्सींग आहे, लोकशाही राहिलेली नाही. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात काम करणारे झाले आहे, असंही दानवे म्हणाले.

" महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काही नेत्यांनी गुन्हेगारांना बोलावून घेतलं होतं, त्यांना आता पॅरोलवर सोडलं होतं. आजही महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आहे. भाजपचे आणि शिंदे गटाचे आमदार गोळीबार करतात त्यांच्यावर कारवाई काय झाली, असा सवालही दानवे यांनी केला. ठाणे, भिवंडी या पट्ट्यात जमिनी हडपणे सुरू आहे. ठिक ठिकाणी गुंडांना आश्रय दिला जातो. असं या महाराष्ट्राने आधी बघितले नाही. काँग्रेस राज्य होतं पण असं गुंडांचे राज्य कधीच नव्हते, असा आरोपही दानवे यांनी केला. 

"ईव्हीएममध्ये येणाऱ्या निवडणुकीत फेरफार होऊ शकतो. राजस्थानमध्येही अशी गोष्ट समोर आली आहे. आता एक चोरी उघड झाले म्हणून हे समोर आले आहे. आताच्या या घडीला महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आहे, असंही दानवे म्हणाले. 

Web Title: Leader of Opposition Ambadas Danve criticized the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.