शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

नेत्यांच्या निवडणुकीचे ‘गोकुळ’वर ओझे, सुपरवायझर्सना लावले कामाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 22:12 IST

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) यंत्रणेचा व्यक्तिगत राजकारणासाठी कसा वापर केला जातो यासंबंधीचे एक प्रकरण गुरुवारी समोर आले. संघाच्या सुपरवायझर्सना गावोगावची निवडणुकीत उपयोगी पडू शकेल अशी राजकीय माहिती संकलित करण्याचे काम दिले आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) यंत्रणेचा व्यक्तिगत राजकारणासाठी कसा वापर केला जातो यासंबंधीचे एक प्रकरण गुरुवारी समोर आले. संघाच्या सुपरवायझर्सना गावोगावची निवडणुकीत उपयोगी पडू शकेल अशी राजकीय माहिती संकलित करण्याचे काम दिले आहे. त्यासाठी चक्क पाच पानांचा फॉर्मच दिला आहे. हा एक फॉर्म भरतानाही चांगलाच घाम फुटेल इतकी माहिती विचारली आहे.संघाचे नेते समजले जाणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा मुलगा आमदार अमल हा भाजपचा आमदार आहे. पुतण्या खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. माजी आमदार पी. एन. पाटील हे करवीर मतदार संघातील काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे पुतणे चंद्रदीप नरके शिवसेनेचे आमदार आहेत. त्याशिवाय ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, धैर्यशील देसाई तसेच संजयबाबा घाटगे हे विधानसभेचे संभाव्य उमेदवार आहेत. परंतू सा-या जिल्ह्यातून इतकी तपशीलवार माहिती गोळा करण्यामागे खासदार महाडिक यांची लोकसभेची निवडणूक असण्याची शक्यता जास्त आहे. अन्य इच्छुक इतक्या पध्दतशीरपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आजवरचा अनुभव नाही. ‘गोकुळ’ने ही माहिती एनडीडीबीला हवी आहे, असे कारण पुढे केले आहे. गेल्या शनिवारपासून ती गोळा केली जात आहे. त्यामुळे ही माहिती नक्की कशासाठी संकलित केली जात आहे, हे जाहीर करण्याची जबाबदारी आता संघाच्या नेतृत्वाची व व्यवस्थापनाची आहे.दूध संघाच्या कामासाठी ही माहिती हवी असती तर ती फक्त दूध संस्थांपुरतीच मर्यादित राहिली असती परंतू तसे घडलेले नाही. या माहितीमध्ये गावाचे नांव, ग्रामदैवत, यात्रा, पंचायत समिती, जिल्हापरिषद व विधानसभेचा मतदार संघ कोणता हे विचारण्यात आले आहे. त्याशिवाय सत्तास्थाने मध्ये सेवा सोसायट्या,पाणी पुरवठा संस्था, दूध संस्था, पतसंस्था, शिक्षण संस्था व त्यांच्या प्रमुख पदाधिका-यांचे संपर्क नंबर संकलित करण्याच्या सूचना आहेत. गावांतील सहकारी बँकांतील आजी- माजी पदाधिका-यांची आणि जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्यांचीही माहितीही गोळा करण्यात येत आहे. त्या गावांतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,भाजपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना, शेकाप, जनसुराज्य,जनता दल,रामदास आठवले गट, प्रा. जोगेंद्र कवाडे गट, प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, बसप आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांची नांवेही संकलित केली जाणार आहेत. त्या शिवाय संबंधित गावच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत. त्या लिहिण्यासाठी तब्बल एक पानच दिले आहे. एवढी सविस्तर माहिती टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसारखी नामांकित संस्थाही कधी गोळा करत नाही. या माहितीची दूध संघाला गरज काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.सरासरी १० गावे...संघाकडे सध्या सुमारे १७५ सुपरवायझर आहेत. त्यांना प्रत्येकी ९ ते १० गावांची ही माहिती गोळा करावी लागणार आहे. पदाधिकाºयांची नांवे, त्यांचे मोबाईल क्रमांक गोळा करताना चांगलाच फेस येत असल्याची प्रतिक्रिया एका सुपरवायझरने ‘लोकमत’ कडे व्यक्त केली.निवडणूक निधीही..मध्यंतरी राधानगरी तालुक्यातील एका संचालकांने मी तुम्हांला नोकरी लावले म्हणून कर्मचाºयांच्या बोनसमधून कांही रक्कम विधानसभा निवडणूकीसाठीच कपात करून घेतली होती.व्यवस्थापनाचा संपर्क नाहीदरम्यान या माहिती बाबत संघाच्या  व्यवस्थापनाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर