शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

तीनशे व्यापाऱ्यांना एलबीटीच्या नोटिसा

By admin | Updated: November 12, 2014 00:16 IST

२० नोव्हेंबरची अंतिम मुदत : आठवड्यात पावणेदोन कोटी वसूल

कोल्हापूर : राज्य शासनाकडून एलबीटीला (स्थानिक संस्था कर) पर्याय देण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच दिवाळीनंतर पुन्हा महापालिकेची घसरलेली एलबीटीची गाडी आता रुळावर येत आहे. आजअखेर ४८ कोटींपर्यंत एलबीटी वसूल झाला आहे. वसुलीची मोहीम अधिक तीव्र करीत महापालिकेने एलबीटी न भरणाऱ्या ३०० व्यापाऱ्यांना नोटिसा बजावत २० नोव्हेंबरपर्यंत अखेरची मुदत दिली. त्यानंतर या व्यापाऱ्यांची खाती गोठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने पत्रकाद्वारे दिली आहे.महापालिकेचा जकातीचा हुकमी उत्पन्नाचा स्रोत बंद करून शासनाने स्वयंमूल्यांकनावर आधारित एलबीटी ही नवीन करप्रणाली तीन वर्षांपूर्वी १ एप्रिल २०११ रोजी सुरू केली. महापालिकेला जकातीमधून १२५ कोटींपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळत होते. राज्य शासनाचे धोरण व व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे एलबीटी जमा करणे जिकिरीचे झाले. पहिल्या वर्षी २०११-१२ साली ६८ कोटी, त्यानंतर २०१२-१३ मध्ये ८३ कोटी, तर मागील वर्षी २०१३-१४ मध्ये ९२ कोटी एलबीटीतून महापालिकेला मिळाले. आता पुन्हा एलबीटीला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याचे चित्र आहे. सात महिन्यांत एलबीटीतून महापालिकेला तब्बल ४८ कोटी रुपये मिळाले. एलबीटी वसुलीची मोहीम तीव्र करणार असल्याने व्यापाऱ्यांनी कटू कारवाई टाळून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)