शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी दवाखान्यात अनास्था, श्वान दंश रुग्णांच्या जीवावर; तरुणीच्या मृत्यूनंतर कोल्हापुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न एैरणीवर

By भीमगोंड देसाई | Updated: March 6, 2024 18:08 IST

ॲन्टी रेबीज सिरमचे इंजेक्शन वेळेत देण्यास टाळाटाळ

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : श्वान दंश झाल्यानंतर वेळेत आवश्यक ते सर्व उपचार करण्यात शासकीय दवाखान्यात हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे कुत्र्याने चावा घेतलेल्या लोकांना काही दिवसांनी जीव गमवावा लागत आहे. कुत्रा चावला आहे, असे सांगत सीपीआर, तालुका रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर त्याच्यावर वेळ मिळेल त्यावेळी उपचार केले जातात. ज्याला कुत्र्याने चावा घेतला आहे, त्याला कोणत्या प्रकारचे उपचार घेतले पाहिजेत, हे माहीत नसते. त्यामुळे संबंधित एक इंजेेक्शन घेऊन निघून जातो, असे बहुतांशी श्वान दंश प्रकरणात होत आहे.

नागाळा पार्कातील युवतीचा श्वान दंश झाल्यानंतर रेबीजने मृत्यू झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांचा आणि श्वान दंशावरील उपचाराचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील सर्व भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर चोवीस तासांच्या आत ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन घ्यावेच लागते. कुत्रा चाटला असेल, दात लागला नसेल, जखमांचे फक्त व्रण असेल तर केवळ ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन घ्यावे लागते. कुत्र्याचे दात लागले असतील किरकोळ जखम झाली असेल तर त्याच्या ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन चोवीस तासांत एक त्यानंतर तीन दिवसांनी, सात दिवसांनी, चौदा दिवसांनी, २८ दिवसांनी घ्यावे लागते. इंजेक्शन स्नायू आणि त्वचेत घ्यावे लागते. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रक्तस्त्राव झाला असेल ॲन्टी रेबीजसह चोवीस तासांत जखमेजवळ ॲन्टी रेबीज सिरमचे इंजेक्शन द्यावे लागते. श्वान दंश झालेल्या अनेकांना सिरमचे इंजेक्शन घ्यावे लागते, हेच सांगितले जात नाही. त्यामुळे कुत्र्याने शरीराचे लचके तोडले तरी केवळ ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन देऊन पाठवले जाते. परिणामी काही दिवसांनंतर रेबीजची बाधा होण्याचा धोका असतो.

फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतोमहापालिका घरफाळा घेत असताना कुत्रा कर घेते. या करातून शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, निर्बिजीकरण करणे बंधनकारक आहे. हे काटेकोरपणे केले जात नसल्याने भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. त्यांच्या हल्ल्यात बळी गेल्यास निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महापालिका अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. न्यायालयात भरपाईसाठी दाद मागता येते.

कधीपर्यंत अधिक धोका ?पाणी, उजेडाची भीती वाटणे, अन्न, पाणी गिळता न येणे, श्वसनाचा त्रास होणे अशी रेबीजची लक्षणे आहेत. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर चार दिवस ते सहा महिन्यांपर्यंत रेबीज होण्याचा धोका जास्त असतो. मेंदूपासून किती जवळ कुत्र्याने चावा घेतला तितका रेबीजचा धोका वाढत जातो. काही प्रकरणांत तीन, सहा वर्षांनीही रेबीज झाल्याचे पुढे आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdogकुत्राhospitalहॉस्पिटल