शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

शाहू जयंतीदिनी लोकजीवन संग्रहालयाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 10:48 IST

Shahu Maharaj Chhatrapati Shivaji University kolhapur -येत्या २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शाहूकालीन लोकजीवन संग्रहालयाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ही माहिती दिली. लोकमतने ३४ वर्षांपासून हे संग्रहालय रखडल्याची दोन भागांची मालिका प्रकाशित केली होती. याची दखल घेत शिर्के यांनी विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.

ठळक मुद्देशाहू जयंतीदिनी लोकजीवन संग्रहालयाचा प्रारंभ डी. टी. शिर्के यांची माहिती, लोकमतच्या बातमीचा परिणाम

कोल्हापूर - येत्या २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शाहूकालीन लोकजीवन संग्रहालयाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ही माहिती दिली. लोकमतने ३४ वर्षांपासून हे संग्रहालय रखडल्याची दोन भागांची मालिका प्रकाशित केली होती. याची दखल घेत शिर्के यांनी विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.कोल्हापूरमध्ये न्यू पॅलेस येथे शाहू महाराजांविषयी माहिती देणारे संग्रहालय आहे. मात्र शाहूकालीन लोकजीवन कळावे यासाठी असे संग्रहालय उभारण्याची मूळ कल्पना पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी मांडली होती.

यानंतर शाहू संशोधन केंद्राकडून याबाबतची कार्यवाही सुरू झाली. त्यावेळी प्रा. टी. एस. पाटील यांची अभिरक्षक म्हणून नेमणूकही करण्यात आली. मात्र शासनाकडून पदांना मान्यता न मिळाल्याने पाटील यांनी ही नोकरी सोडली. दरम्यानच्या काळात त्यांनी समाजातील सर्व थरातील नागरिक,व्यावसायिक, संस्था यांच्या सहकार्याने २५० हून अधिक वस्तूंचे संकलन केले. परंतु त्यानंतर याबाबत फारशा हालचाली झाल्या नाहीत.ही वस्तुस्थिती लोकमतने दोन भागांच्या मालिकेद्वारे मांडली. याची दखल घेत कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यवस्थापन समितीच्या सदस्य प्रा. भारती पाटील आणि संग्रहालय विषयातील तज्ज्ञ निलांबरी जगताप यांच्याशी चर्चा केली. सध्या संग्रहालयासाठी विद्यापीठ समोरील पोस्ट ऑफिस शेजारी इमारत उभी आहे. यामध्ये येणाऱ्या शाहू जयंती दिनी हे संग्रहालय सुरू होईल असा मी शब्द देतो असे डॉ. शिर्के यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. शाहूकालीन लोकजीवन कसे होते याचे प्रत्यंतर या शिवाजी विद्यापीठाच्या या नव्या संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेला कळेल असा विश्वासही शिर्के यांनी व्यक्त केला.जागरमुळे फुटली कोंडीलोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी पंधरवड्यापूर्वी त्यांच्या जागर सदरामध्ये कोल्हापूरच्या पर्यटनाबाबत आपण कशामुळे पिछाडीवर आहोत याची मांडणी केली होती. यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. यातूनच अशा प्रकारचे हे संग्रहालय ३४ वर्षे कागदावरच असल्याची माहिती मिळाली. यानंतर प्रा. टी. एस. पाटील आणि डॉ. जयसिंगराव पवार यांच्याशी चर्चा करून लोकमतने दोन भागांच्या मालिकेत वस्तुस्थिती मांडली आणि आता कुलगुरूंनीच शाहू जयंतीदिनी हे संग्रहालय सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

शिवाजी विद्यापीठामध्ये शाहू कालीन लोकजीवनाचे संग्रहालय उभारण्याची कल्पना कशी रखडली याची माहिती लोकमतने दिली. संकलित वस्तू नेमकेपणाने मांडण्यासाठी विद्यापीठासारख्या संस्थेकडून काही ना काही कारणाने विलंब झाल्याचे यातून समजले. हा प्रकल्प मार्गी लागण्याची गरज आहे.निवास माने,उद्योजक, कोल्हापूर

अशा पद्धतीचा प्रकल्प शिवाजी विद्यापीठाने हाती घेतला होता याचीच आमच्या पिढीला माहिती नव्हती. मात्र लोकमतमुळे या प्रकल्पाची माहिती मिळाली. कोल्हापूरचे शाहूकालीन लोकजीवन समजण्यासाठी हे संग्रहालय अत्यावश्यक आहे.यशोधन जोशी,अभियंता, मुळ कोल्हापूर सध्या पुणे

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती