शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Kolhapur: स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचा वारसदार ठरला, करवीर विधानसभेसाठी राहुल पाटील लढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 15:26 IST

राजेश पाटील यांनी केली घोषणा 

कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर करवीर विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हेच त्यांचे विधानसभा मतदारसंघाचे वारसदार असून, येणारी निवडणूक तेच लढतील, अशी घोषणा त्यांचे मोठे बंधू, श्रीपतरावदादा बोंद्रे बँकेचे चेअरमन राजेश पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. या घोषणेमुळे करवीरमधून कोण लढणार याची ताणलेली उत्सकुता संपली आहे.आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाने त्यांच्या कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यांची पोकळी कोण भरून काढणार याची चर्चा सुरू असताना रविवारी त्यांच्या समर्थकांनी वाकरे फाट्यावरील विठाई चंद्राई लॉनवर भव्य मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आमदार पी. एन. पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आमचे पालकत्व घेऊन करवीर विधानसभा लढवावी, असा निर्णय एकमताने घेतला. राजेश व राहुल पाटील या दोन्ही बंधूंपैकी विधानसभा कोणी लढवायची याचा निर्णय पाटील कुटुंबीयांनीच घ्यावा, असे मेळाव्यात ठरवले. तो निर्णय कार्यकर्त्यांच्या वतीने गोकूळचे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे यांनी तत्काळ पाटील कुटुंबीयांना कळवला.

कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत राजेश पाटील यांनी राहुल हेच स्व. पी. एन. पाटील यांचे विधानसभेच्या राजकारणाचे वारसदार असून, तेच आगामी विधानसभा लढवतील, अशी घोषणा केली. यावेळी विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, प्रा. शिवाजीराव पाटील, बाजार समितीचे सभापती भारत पाटील, इंद्रजित बोंद्रे, प्रा. आर. के. शानेदिवाण, रणजित पाटील, चेतन पाटील, राजकिरण मोहिते, संदीप पाटील, बी. एच. पाटील उपस्थित होते.पी. एन. यांचा वारसा सक्षमपणे चालवूज्या पद्धतीने पी. एन. पाटील यांनी छोट-मोठ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केले त्यांचा तोच वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.बँक, गोकूळबाबत त्या त्या वेळी निर्णयजिल्हा बँक, गोकूळ दूध संघात पी. एन. पाटील गटाची भूमिका त्या त्या वेळी ठरवणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. तर, जिल्हा बँकेबाबत बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणP. N. Patilपी. एन. पाटील