शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

महापौरपदासाठी लाटकर, शेटके यांच्यात लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:58 AM

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आघाडीवर असलेल्या ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांनी अनपेक्षितपणे महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे आता सूरमंजिरी लाटकर (राष्ट्रवादी ) व भाग्यश्री शेटके (भाजप) यांच्यात महापौरपदासाठी, तर संजय मोहिते (कॉँग्रेस) व कमलाकर भोपळे (ताराराणी) यांच्यात उपमहापौरपदासाठी लढत होणार आहे. ही निवडणूक मंगळवारी (दि. १९) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

ठळक मुद्देमहापौरपदासाठी लाटकर, शेटके यांच्यात लढतसंजय मोहिते - भोपळे उपमहापौरसाठी अर्ज

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आघाडीवर असलेल्या ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांनी अनपेक्षितपणे महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे आता सूरमंजिरी लाटकर (राष्ट्रवादी ) व भाग्यश्री शेटके (भाजप) यांच्यात महापौरपदासाठी, तर संजय मोहिते (कॉँग्रेस) व कमलाकर भोपळे (ताराराणी) यांच्यात उपमहापौरपदासाठी लढत होणार आहे. ही निवडणूक मंगळवारी (दि. १९) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.कोल्हापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी शुक्रवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत उमेदवारी अर्ज भरायचे होते. या वेळेत महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या सूरमंजिरी राजेश लाटकर यांनी, तर भाजपच्या भाग्यश्री उदय शेटके यांनी, तसेच उपमहापौरपदासाठी कॉँग्रेसचे संजय वसंतराव मोहिते, तर ताराराणी आघाडीचे कमलाकर यशवंत भोपळे यांनी आपले अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही आघाड्यांकडील नगरसेवक तसेच समर्थक महापालिकेत मोठ्या संख्येने जमले होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या समर्थकांनी फटाकेही फोडले.गेल्या काही दिवसांपासून ताराराणी आघाडीकडून स्मिता मारुती माने यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत होते. त्याला अनेक संदर्भही होते. ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी माने यांच्यासाठी मोठे जाळेदेखील टाकले होते; परंतु पाच-सहा दिवसांत काहीच जाळ्यात सापडत नाही म्हटल्यावर कदाचित माने यांनीच या शर्यतीतून माघारी घेतली असल्याची चर्चा आहे. त्यांच्या माघारीमुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जी रंगत भरली होती, ती आता दूर झाली.भाजप-ताराराणीकडून नगरसेवक फोडाफोडीचे प्रयत्न होत असल्याची कर्णोपकर्णी माहिती कळताच कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही भाजप, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. भाजपचे दोन, तरराष्ट्रवादीचे दोन नगरसेवक त्यांच्या हाताला लागले असल्याची माहिती समोर आली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी कॉँग्रेसबरोबरची आपली आघाडी कायम ठेवले आहे. त्यामुळे भाजप-ताराराणीचे अवसान गळले. त्यांनी माने यांच्याऐवजी शेटके यांचा उमेदवारी अर्ज भरला. शेटके आणि भोपळे यांचा अर्ज भरणे म्हणजे पराभवाचे निशाण फडकावण्यातीलच प्रकार आहे.भाजप - ताराराणीचा ‘व्हिप’ लागूदोन दिवसांपूर्वी कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने आपल्या नगरसेवकांना व्हिप बजावल्यानंतर शुक्रवारी भाजप-ताराराणी आघाडीतर्फे त्यांच्या नगरसेवकांना व्हिप लागू करण्यात आला. त्यामुळे आता भाजपचे नगरसेवक संभाजी जाधव व जयश्री जाधव काय भूमिका घेणार हे सभागृहात मतदानावेळी स्पष्ट होईल. संभाजी यांचे बंधू, तर जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव सध्या कॉँग्रेसचे आमदार आहेत. त्यांना निवडून आणण्यात आमदार सतेज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

किती कालावधी मिळणार?सूरसंजिरी लाटकर महापौर झाल्यावर त्यांना नेमका किती महिन्यांचा कार्यकाळ मिळणार हे गुलदस्त्यात आहे. राजेश लाटकर यांनी विधानसभा निवडणुकीत ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांना कॉँग्रेसकडून काही महिन्यांचा बोनस मिळण्याची शक्यता आहे; परंतु कितीही केले तरी हा कार्यकाल सहा महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही.अशोक जाधव नाराजउपमहापौरपदासाठी संजय मोहिते यांच्यासह अशोक जाधव हेदेखील इच्छुक होते. आमदार पाटील यांनी दोघांना सहा-सहा महिन्यांकरिता उपमहापौर केले जाईल, असे स्पष्ट केले; परंतु ‘आधी मलाच संधी द्या,’ असा जाधव यांचा आग्रह होता. जेव्हा अर्ज भरण्याच्या आधी काही मिनिटे आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधला गेला ‘तेव्हा संजय मोहिते यांचा अर्ज भरा,’ असा निरोप दिला. हा निरोप ऐकून जाधव कमालीचे नाराज झाले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर