शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

शेवटच्या दिवशी उमेदवारांची तोबा गर्दी

By admin | Updated: October 14, 2015 01:03 IST

महापालिका निवडणूक : ९१५ उमेदवारांचे १५२८ अर्ज दाखल

कोल्हापूर : राज्यात आणि देशात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना पक्षांसह कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, स्थानिक आघाड्यांनी सर्व शक्तीनिशी सहभाग घेतल्यामुळे चुरशीच्या बनलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील ८१ प्रभागांतून ६०२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आतापर्यंत अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या आता ९१५ इतकी झाली आहे. पदयात्रा, मोटारसायकल रॅलीसह जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात कोणी उमेदवार मागे राहिले नाहीत. त्यामुळे मंगळवारी अवघे शहर निवडणूकमय होऊन गेले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आठव्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया ६ आॅक्टोबरपासून सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार हा अखेरचा दिवस होता. गेले आठ दिवस पितृपक्ष व सर्वपित्री अमावास्येमुळे निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्यास फारसा उत्साह दाखविला नाही; परंतु अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी घटस्थापनेचा मुहूर्त साधत मोठ्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज भरले. त्यामुळे शहरातील सातही क्षेत्रीय कार्यालये नागरिकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेली. सर्वच कार्यालयांत उमेदवारांनी रांगा लावून आपले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. शेवटच्या दिवशी उमेदवारांची तोबा गर्दीशिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी काही निवडणूक कार्यालयात जाऊन आपल्या उमेदवारांचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत भाग घेतला. भाजपबरोबर आघाडी केलेल्या ताराराणी आघाडीचे नेते माजी महापौर सुनील कदम, नगरसेवक सत्यजित कदम ‘आरपीआय’चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे यांनीही निवडणूक कार्यालयात जाऊन आघाडीच्या उमेदवारांचा उत्साह वाढविला. प्रारूप तसेच अंतिम याद्यांत झालेले बदल यांमुळे पुरवणी याद्या मंगळवारी उमेदवारांच्या हातात पडल्या. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरेपर्यंत उमेदवारांची बरीच धावपळ उडाली. काही उमेदवारांचे मतदार यादीतील क्रमांक व पत्ते बदलल्याचे निदर्शनास आल्यानंतर तर एकच तारांबळ उडाली. उमेदवारांना निवडणूक खर्च करण्याकरिता बॅँक खाते उघडण्याची सक्ती आहे; परंतु अनेकांना त्याची कल्पना नसल्याने नवीन खाते उघडण्याचीही धावपळ करावी लागली. निवडणूक कार्यालयात उमेदवारासह कितीजणांना प्रवेश द्यायचा यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांत बऱ्याच ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवत होते. उत्सुकता, धावपळ, गर्दी आणि उत्कंठा अशा वातावरणातच अर्ज भरण्याची मुदत संपली. एकूण उमेदवारी अर्जांचा तक्ताकोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटच्या दिवसाअखेर ८१ प्रभागांसाठी एकूण ९१५ उमेदवारांचे १५२८ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये मंगळवारी ६०२ उमेदवारांनी १००० अर्ज दाखल केले. आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांचा तक्ता खालीलप्रमाणे. नाव मंगळवारचे उमेदवार अर्ज दाखल एकूण उमेदवार अर्ज दाखलकसबा बावडा पॅव्हेलियन ६३ १२८ ९० १६६ नागाळा पार्क ९८ १७५ १२० २५४ ताराराणी मार्केट ८३ १२३ १२१ २१३ जगदाळे हॉल ७६ १५६ १२३ २२८ दुधाळी पॅव्हेलियन ९३ १४३ १५२ २३० गांधी मैदान ९२ १३९ १५५ २२९ मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम ९७ १३६ १५४ २०८ ..............................................................................................................................एकूण ६०२ १००० ९१५ १५२८निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी 14 आॅक्टोबर २०१५ सकाळी ११.०० वाजलेपासून ज्या-त्या क्षेत्रीय कार्यालयांत करण्यात येणार असून छाननी पूर्ण झाल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.शक्तिप्रदर्शनामुळे शहर निवडणूकमयशहराच्या बहुसंख्य भागांत अनेक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनाचा डामडौल टाळत मोजक्या कार्यकर्त्यांच्या साथीने नजीकच्या निवडणूक कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मात्र आपले वजन दाखविण्याची संधी या निमित्ताने दवडली नाही. शेकडो कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह झांजपथकांच्या गजरात पदयात्रा, मोटारसायकल रॅली काढत या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले. विविध राजकीय पक्षांचे ध्वज, टोप्या आणि स्कार्फ परिधान केलेल्या कार्यकर्त्यांच्या पदयात्रामुळे निवडणूकमय वातावरण निर्माण झाले होते. शेवटच्या दिवशी १००० अर्ज दाखलकोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटच्या दिवसाअखेर ८१ प्रभागांसाठी एकूण ९१५ उमेदवारांचे १५२८ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये मंगळवारी ६०२ उमेदवारांनी १००० अर्ज दाखल केले. मुदत संपल्यानंतरही प्रक्रिया सुरूउमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली; परंतु त्या वेळेत कार्यालयात आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येत होते. विशेषत: राजारामपुरी जगदाळे हॉल येथे मुदत संपल्यानंतरही अर्ज घेतले जात असल्यावरून कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकारी यांच्यात वादावादी झाली; परंतु पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना बाहेर काढले. तीन वाजेपर्यंत जे उमेदवार कार्यालयात पोहोचले होते, त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. .