शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

सेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांचा सत्यानाश झाला

By admin | Updated: May 7, 2017 01:13 IST

गुलाबराव पाटील यांचा घणाघात : सध्या महाराष्ट्राला आली मोठी सूज; शिवसेना वर्धापनदिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांसह पक्ष सोडून गेलेल्यांचा सत्यानाश झाला आहे, अशी घणाघाती टीका सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी येथे केली. सध्या महाराष्ट्राला एक मोठी सूज आली असून, दोन-चार ‘लॉसेक्स’च्या गोळ्या दिल्यावर ती उतरेल, अशा शब्दांत मित्रपक्ष भाजपलाही नाव न घेता त्यांनी टोला लगावला.कोल्हापूर शिवसेनेच्या ३१व्या वर्धापनदिनानिमित्त केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार सोहळा व पदाधिकारी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रमुख उपस्थिती आमदार वैभव नाईक, शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, महापालिका परिवहन समिती सभापती नियाज खान, नगरसेवक प्रतिज्ञा उत्तुरे, राहुल चव्हाण, मंगल साळोखे, किशोर घाटगे, दीपक गौड, जयवंत हारुगले, उदय पवार, वैशाली राजशेखर, दिग्दर्शक यशवंत भालकर, आदींची होती. दरम्यान, मंत्री पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिक, आजी, माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.पक्ष सोडून गेलेला एकही जण सुखी नसून नारायण राणे यांना दररोज एक वाटी औषधांच्या गोळ्या लागतात. छगन भुजबळ हे दुसरे आसाराम बापू झाले आहेत, तर राज ठाकरेंचे काही सांगायलाच नको, अशी सर्वांची अवस्था झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. शिवसेना संपविण्याची सुपारी घेणारे सगळे संपले असून, त्यातील शेवटचे एकनाथ खडसे असून, त्यांचे काय झाले ते आपण पाहतच आहोत, असेही त्यांनी सांगितले.जे कॉँग्रेसच्या राजवटीत झाले त्यापेक्षाही वाईट दबावतंत्र सध्या सुरू आहे, अशा शब्दांत भाजपचे नाव न घेता त्यांनी टीका केली. सध्या थोडा वाईट काळ असला तरी शिवसेनेला कोणी संपवेल ही डोक्यातील भीती शिवसैनिकांनी काढून टाकावी. कारण काम करणाऱ्यांविरोधात कुठलीच लाट आडवी येऊ शकत नाही. आपल्या कामाशी इमानदार राहा, लोकांची कामे करा, स्वत:ची पदे टिकवा, असा कानमंत्रही त्यांनी शिवसैनिकांना दिला.डॉ. शिवरत्न शेटे यांनी नाव न घेता भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. सत्ता आल्यावर काही पक्षांना मस्ती आली असून, जेवढा त्रास कॉँग्रेसने दिला नाही तितका त्रास त्यांच्याकडून दिला जात आहे. साम, दाम, दंड, भेद अशी नीती वापरून भगव्याला चिरडण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी निरपेक्ष व कडवट शिवसैनिकांची फौज आहे तोपर्यंत यांच्या सात पिढ्या आल्यातरी शिवसेनेला संपविणे कठीण असल्याचे शेटे यांनी यावेळी सांगितले.यावेळी वैभव नाईक, उदय पोवार, वैशाली राजशेखर, दीपक गौड यांची भाषणे झाली. पद्माकर कापसे यांनी स्वागत केले. जोपर्यंत तुमच्यामागे शिवसेना तोपर्यंत तुम्हीआपल्यातही आता खेकडे होत आहेत. एकमेकांना पुढे न जाऊ देण्यासाठी ‘टांगा’ मारल्या जात आहेत. हे स्वत:साठी व पक्षासाठीही हानीकारक आहे, जोपर्यंत तुमच्या मागे ‘शिवसेना’ हे नाव आहे तोपर्यंत तुम्ही आहात, जेव्हा हे नाव तुमच्या मागून जाईल तेव्हा तुमचा ‘कार्यक्रम’ होईल, असा इशारा मंत्री पाटील यांनी शिवसैनिकांना दिला.आमिषाला बळी पडू नकाअनेक शिवसैनिकांना भाजपकडून फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून पदांची आमिष दाखविले जात आहे. त्याला बळी पडून भगव्याशी व शिवसेनाप्रमुखांशी गद्दारी करू नका, अशी हात जोडून विनंती करतो, असे भावनिक आवाहन डॉ. शेटे यांनी केले.शिवसेना मुस्लिमविरोधी नाहीजाणीवपूर्वक शिवसेना ही मुस्लिमविरोधी असल्याची प्रतिमा निर्माण केली जात आहे, परंतु हे खोटे आहे. कारण पक्षामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम असून, दिवसेंदिवस येणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.पक्षांतर करणार नसल्याची शपथ घ्यामरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, कधीही पक्षांतर करणार नाही, अशी शपथ घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहूया, असे आवाहन डॉ. शेटे यांनी केले.