शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बनावट कागदपत्रे करून जमिन हडप, डीवायएसपी जाधवरसह चौघावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 15:21 IST

बनावट कागदपत्रे तयार करून जमिन हडप केल्याप्रकरणी तसेच जमिनीत येण्यास मज्जाव करून धमकी दिल्या प्रकरणी चंदगड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व सध्या गडहिंग्लज येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत असणारे अंगद जाधवर, सध्या अटक असलेला आरोपी गणेश फाटक यांच्यासह अन्य तिघावर चंदगड पोलिसात नोंद झाला आहे.

ठळक मुद्देबनावट कागदपत्रे करून जमिन हडप, गडहिंग्लज विभागात खळबळगडहिंग्लजचे डीवायएसपी अंगद जाधवर सह चौघावर गुन्हा दाखल

तेऊरवाडी  : सडेगूडवळे ता.चंदगड येथील जमिन बनावट कागदपत्रे तयार करून हडप केल्याप्रकरणी तसेच जमिनीत येण्यास मज्जाव करून धमकी दिल्या प्रकरणी चंदगड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व सध्या  गडहिंग्लज येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत असणारे अंगद जाधवर, सध्या अटक असलेला आरोपी गणेश फाटक यांच्यासह अन्य तिघावर चंदगड पोलिसात नोंद झाला आहे.  याबाबतची फिर्याद लक्ष्मण भोजू तांबाळकर रा. हंबिरे पो. नांदवडे ता. चंदगड या शेतकऱ्यांने चंदगड पोलिसांत दिली आहे. गडहिंग्लज विभागाचे पोलिस उपअधिक्षक अंगध जाधवर, गणेश महादेव फाटक ( हिंडगाव ), श्रीशैल तम्मन्ना नागराळ ( तिलारी नगर), मारूती धोंडिबा गुरव ( कानुर बु. ) , मारूती तातोबा कांबळे ( कानूर बु . ) यानी सन २००९ते एप्रिल २०२० पर्यंत  फिर्यादी लक्ष्मण तांबाळकर याबरोबरच धोंडीबा गावडे व संतोष गावडे यांच्यासह इतर सह हिस्सेदार  दत्तात्रय गावडे, शंकर गावडे , शिवाजी गावडे , तानाजी गावडे, सुर्यकांत गावडे , तुळसा गावडे , सुभद्रा गावडे , कृष्ण झेंडे , श्रीमती रुक्मीणी गावडे , कृष्णा गावडे , नामदेव गावडे , भिमा गावडे राहणार  सडेगुडवळे ता. चंदगड याची जमिन खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केली तसेच फिर्यादी याना या जमिनित येणेस प्रतिबंध करून शिवीगाळ करुन दहशत निर्माण केली.

या बरोबरच गोळी घालण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद चंदगड पोलिसात दिली आहे . यानुसार चंदगड पोलिसात पोलिस उपअधिक्षक अंगद जाधवर यांच्यासह इतर चार आरोपी वर भा . द .वि.स. कलम ४२० , ४६४ , ४६८ , ४७१ , ४४७ , ४२७ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . या घटनेने चंदगड सह कोल्हापूर जिल्हयात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी डिवायएसपी अंगद जाधवर यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल कव्हरेज क्षेत्राबाहेर होता

तडशिनहाळ येथील अरूण दरेकर व अक्षय मारूती गावडे या युवकाना एका गून्ह्यातून नाव काढतो असे सांगून दोघाकडून दोन लाख चाळीस हजार रूपये रक्कम उकळून फसवणूक प्रकरणी अटक असलेला गणेश फाटक याच्या पोलिस कोठडीत शूक्रवारपर्यंत  तिसर्यादा वाढ झाली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूर