शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आजरा एमआयडीसीसाठीची जमीन महसूल विभागाकडे, उद्योग विभागाला हस्तांतरित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 15:31 IST

कोल्हापूर : आजरा एमआयडीसीच्या विस्तारासाठी आवश्यक असणारी १७.७२ हेक्टर आर जमीन महसूल विभागाकडे वर्ग करण्यास कृषी व पशुसंवर्धन विभागाने ...

कोल्हापूर : आजरा एमआयडीसीच्या विस्तारासाठी आवश्यक असणारी १७.७२ हेक्टर आर जमीन महसूल विभागाकडे वर्ग करण्यास कृषी व पशुसंवर्धन विभागाने मान्यता दिली आहे. याबाबत ६ जानेवारी २०२५ रोजी शासन आदेश काढण्यात आला आहे. याआधी ही जमीन थेट ऊर्जा व कामगार विभागाकडे वर्ग करण्याचा शासन आदेश काढण्यात आला होता. तो आता रद्द करण्यात आला असून, महसूल विभागाकडून उद्योग विभागाला ही जमीन आता हस्तांतरित करण्यात येणार आहे.आजरा एमआयडीसीचा विस्तार करण्यासाठी आजरा येथील ७.०१ हेक्टर व पारेवाडी येथील १०.७३ हेक्टर इतकी जमीन आवश्यक आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि थेट मुख्यमंत्र्यांनीच या प्रस्तावाला मान्यता दिल्याने ही जमीन थेट उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडे हस्तांतरित करण्याचा शासन आदेश निवडणुकीआधी काढण्यात आला. परंतु, ८ सप्टेंबर २००८ च्या शासन परिपत्रकानुसार महसूल व वन विभागाच्या परवानगीशिवाय जमीन हस्तांतरणावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.तसेच शासकीय विभागांना प्रदान केलेल्या शासकीय जमिनीसंदर्भात अशा जमिनींची शासकीय विभागांना आवश्यकता नसल्यास त्या विभागाने अशा जमिनी महसूल विभागाच्या सहमतीने महसूल विभागाकडे प्रत्यार्पित करणे आवश्यक आहे. त्यानुसार या नव्या शासन आदेशानुसार आता ही जमीन महसूल विभागाकडे प्रत्यार्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यानंतर आता हीच जागा एमआयडीसीच्या विस्तारासाठी उद्योग विभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर मग या ठिकाणी एमआयडीसी विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी