शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोनसचा निर्णय १६ ऑक्टोबरपूर्वी घ्या, अन्यथा..; बांधकाम कामगारांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 17:28 IST

भर पावसातही आंदोलनकर्त्यांचा जोश थोडाही कमी झाला नव्हता.

कोल्हापूर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात बांधकाम कामगारांची फसवणूक केली. कामगारांचे मोठे नुकसान झाले असून वीस हजार रुपये दिवाळी बोनसचा निर्णय १६ ऑक्टोबरपूर्वी घेतला नाही तर कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील निवासस्थानावर मोर्चा काढू, असा इशारा लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे अध्यक्ष भरमा कांबळे यांनी दिला.बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, फोर्ड कॉर्नरमार्गे सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर तिथे सभेत रूपांतर झाले.भरमा कांबळे म्हणाले, आघाडी सरकारमधील तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केवळ गावागावांत नोंदणी करण्यापलीकडे कामगारांसाठी काहीच केले नाही. गेल्यावेळेला बोनस देण्याची घोषणा केली मात्र एक दमडीही हातात पडली नाही. राज्यात सत्तांतर झाल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. त्यांनी गेल्यावर्षीचा दहा व यावर्षीचा दहा असा वीस हजार रुपये बोनस द्यावा.मागण्यांचे निवेदन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना देण्यात आले. यावेळी चंद्रकांत यादव, शिवाजी मगदूम, प्रकाश कुंभार, भगवान घोरपडे, संदीप सुतार, विक्रम खतकर यांच्यासह हजारो बांधकाम कामगार मोर्चात सहभागी झाले होते.महिलांची संख्या लक्षणीय!बांधकाम कामगारांच्या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. ‘कोण म्हणते देत नाही.....’, ‘बांधकाम कामगार एकजुटीचा विजयी असो’, या घोषणांनी सारं कोल्हापूर दणाणून सोडले होते.

भरपावसातही मोर्चाचा जोशमोर्चा सुरू झाल्यानंतर पाऊस सुरू झाला, मात्र, भर पावसातही आंदोलनकर्त्यांचा जोश थोडाही कमी झाला नव्हता. उलट भिजतच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते.

बैठकीसाठी समरजीत घाटगेंचा पुढाकारबांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागणीबाबत कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याशी तातडीने बैठक लावली जाईल, अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी दिल्याचे भरमा कांबळे यांनी सांगितले.

या आहेत मागण्या :

  • दिवाळीला वीस हजार बोनस द्या.
  • बंद केलेली मेडिक्लेम योजना सुरू करा.
  • आरोग्य तपासणी करून रिपोर्ट न देणाऱ्या कंपनीचा ठेका रद्द करा.
  • साठ वर्षांवरील कामगारांना पाच हजार पेन्शन द्या.
  • बोगस बांधकाम कामगार नोंदणीला आळा घाला.
  • एजंटांचा सुळसुळाट थांबवा.
  • माध्यान्ह भोजन योजना बंद करून त्याबदल्यात महिन्याला दोन हजार द्या.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर