शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाड अग्निशमनला बिनतारी संदेश यंत्रणा--: जिल्ह्यातील पहिली नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:50 IST

येथील पालिकेच्या अग्निशमन विभागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अशी यंत्रणा कार्यान्वित सणारी कोल्हापूर महापालिकेनंतर जिल्ह्यातील कुरुंदवाड पालिका पहिलीच आहे. त्यामुळे

ठळक मुद्दे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने हालचाली शक्य

कुरुंदवाड : येथील पालिकेच्या अग्निशमन विभागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अशी यंत्रणा कार्यान्वित असणारी कोल्हापूर महापालिकेनंतर जिल्ह्यातील कुरुंदवाड पालिका पहिलीच आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत संकटावर मात करणे या विभागाला सोपे जाणार आहे.

येथील नगरपालिका ‘क’ वर्गाची असली तरी अग्निशमन विभाग मात्र ‘अ’ दर्जाचा आहे. प्रशिक्षित कर्मचारी, अत्याधुनिक अग्निशमन बंब, बुलेट फायर फायटरने अग्निशमन विभाग जिल्ह्यात अग्रेसर आहे. शहराला तीनही बाजूंनी नदीचा वेढा असल्याने प्रत्येकवर्षी महापुराचा धोका असतो. निमशहरी भाग असल्याने गावालगत ऊस शेती यामुळे आगीची समस्या वारंवार घडत असते. शिवाय बोळ रस्त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास बचावकार्य पोहोचण्यास अडचण निर्माण होत असते. यामुळे येथील अग्निशमन विभाग नेहमीच अग्रेसर असतो.अरुंद रस्त्यामुळे आगीच्या ठिकाणी अग्निशमन गाडी जाण्याची अडचण होत असल्याने गतवर्षी या विभागात बुलेट फायर फायटरचा समावेश करण्यात आला आहे.

एखादी मोठी आग, महापूर, वादळासारखे प्रसंग घडल्यास वेळेत पोहोचण्यासाठी व अग्निशमन कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या संपर्कात येण्यासाठी मोबाईल फोनचा वापर केला जात होता. मात्र, अनेकवेळा मोबाईलला रेंज नसणे, बॅटरी डाऊन होणे, नंबर शोधणे यामुळे वेळ वाया जात असल्याने नावीन्यपूर्ण व जिल्हा नियोजनातून पाच बिनतारी संदेश (वॉकी टॉकी) यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

ड्रायव्हर, फोरमन व इतर अग्निशमन कर्मचाऱ्यांकडे ही बिनतारी संदेश यंत्रणा असून एकाचवेळी पाचही कर्मचारी एकमेकांशी त्वरित संपर्क करू शकतात. यामुळे आपत्कालीन परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी व संदेश देण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. 

या यंत्रणेमुळे अग्निशमन विभाग अत्याधुनिक बनला आहे. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांच्याशी थेट संवाद साधून संकटावर वेळेवर मात करणे सहज शक्य होणार आहे.- नितीन संकपाळ, फोरमन अग्निशमन विभागकुरुंदवाड येथे वॉकीटॉकीवर संपर्क साधताना अग्नीशमन विभागाचे फोरमन नितीन संकपाळ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग