शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कुमार साहित्याचा अभाव धोकादायक : लक्ष्मीकांत देशमुख; कुमार कथा जॉयस्टिकचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 11:58 IST

आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या अवस्थांतराच्या काळात बाल व प्रौढांसाठीच्या साहित्याची निर्मिती होत आहे; मात्र, कुमार साहित्याचा अभाव आहे; त्यामुळे अवस्थांतराच्या स्थितीत असणाऱ्या पिढीला या साहित्याचा अभाव असणे धोकादायक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकुमार साहित्याचा अभाव धोकादायक : लक्ष्मीकांत देशमुखकुमार कथा जॉयस्टिकचे प्रकाशन

कोल्हापूर : आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या अवस्थांतराच्या काळात बाल व प्रौढांसाठीच्या साहित्याची निर्मिती होत आहे; मात्र, कुमार साहित्याचा अभाव आहे; त्यामुळे अवस्थांतराच्या स्थितीत असणाऱ्या पिढीला या साहित्याचा अभाव असणे धोकादायक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे माऊस मीडिया प्रकाशित व सोनाली नवांगुळ लिखित ‘जॉयस्टिक’ या कुमारकथांच्या पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.देशमुख म्हणाले, आजच्या बदलत्या विश्वामुळे कुमार वयोगटाच्या कालखंडातील कथा वाचण्यास मिळत नाहीत. या कालखंडातील वयोगटांसाठी लिहिणे म्हणजे आव्हानात्मक काम आहे. आजच्या बालमनाचे वय ५ ते ८ झाले आहे. पूर्वी ५ ते १० होते. त्यात ८ ते १५ हा वयोगट कुमार होता; मात्र आजची परिस्थितीच वेगळी आहे.

बालमने झपाट्याने बदलत आहेत. अशा काळात भावविश्व समजून कुमार गटासाठी ‘जॉयस्टिक’ सारख्या पुस्तकाची निर्मिती होणे ही चांगली माणसे घडविण्याचे काम आहे. अशा प्रकारची निर्मिती आजच्या साहित्यिकांकडून अपेक्षित आहे.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणाले, सत्त्व टिकवण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती आवश्यक आहे. कुमारांसाठी लिहिणारे लेखकच नाहीत. जे वय कुमार गटाचे आहे. त्या कालखंडासाठी चांगले लिहिणारे पाहिजेत. हीच बाब लेखिका सोनाली व प्रकाशक अमृता यांनी जाणून ‘जॉयस्टिक ’ची निर्मिती केली आहे.

बदलत्या वर्तनशास्त्रानुसार नव्या मुलांचे मानसशास्त्र जणू या साहित्यातून या दोघींनी अधोरेखित केले आहे. आजची मूलं शहाणी आहेत. त्यांच्या कल्पनाविश्वातील भावना या पुस्तकाच्या रूपातून साकारल्या आहेत. माणसे मोठी झाली, तरी त्यांच्यातील लहानपण जागे असते. केवळ ते व्यक्त होत नाही. असे मनोगत लेखिका नवांगुळ यांनी व्यक्त केले.

यावेळी पत्रकार अजय कांडर यांनीही मनोगत व्यक्त केले. अमृता वाळिंबे यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन मुग्धा गोरे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूरLaxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुख