शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आईच्या स्मरणार्थ दिली होती २५ लाखांची देणगी, राजाराम तलावात जीवन संपवलेल्या कुलकर्णी बहीण-भावाचे दातृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 14:19 IST

कोल्हापूर : स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी राजारामपुरी पोलिस ठाण्यात वर्दी मिळाली. दोन मृतदेह राजाराम तलावात तरंगत आहेत म्हणून. पाठीवरच्या सॅकमधील ...

कोल्हापूर : स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी राजारामपुरी पोलिस ठाण्यात वर्दी मिळाली. दोन मृतदेह राजाराम तलावात तरंगत आहेत म्हणून. पाठीवरच्या सॅकमधील कागदपत्रांवरून ओळख पटली आणि दुपारी १२च्या सुमारास दोन्ही मृतदेह सीपीआरच्या शवविच्छेदनगृहासमोर घेऊन रुग्णवाहिका उभी होती. संध्याकाळी शवविच्छेदन झाले आणि ‘आम्ही आईकडे जातो’ असे म्हणत उच्चशिक्षित भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी हे बहीण भाऊ अनंतात विलीन झाले. त्यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या या प्रिय आईच्या स्मरणार्थ वाईच्या प्राज्ञपाठ शाळा मंडळाला तब्बल २५ लाख रुपयांची देणगी दिली होती.या दोघांच्या मातोश्री पद्मजा निळकंठ कुलकर्णी. इतिहास विषयातील एम. ए. व्होकल म्युझिकमध्येही पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. शास्त्रीय संगीत, ज्योतिषशास्त्राचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत हा तर त्यांच्या खूपच आवडीचा विषय होता. आपल्याजवळील धनाचा साठा गरजूंसाठी करावा अशी त्यांची भूमिका होती. पद्मजा यांचे दि. २४ मे २४ रोजी निधन झाले. त्यांच्या दोन्ही मुलांनी उच्चशिक्षित असूनही लग्नं केली नव्हती. त्यामुळेच भूषण आणि भाग्यश्री यांचे जग हे आईपुरतेच सीमित होते. त्यामुळे आईच्या निधनानंतर हे दोघेही सैरभैर झाले. नाळे कॉलनीतील ‘वरदा’ बंगल्यात हे तिघेच. यातूनच त्यांनी जीवनच संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्यांनीच लिहिलेल्या सुसाइड नोटवरून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आई गेल्यानंतरही या दोघांनीही तिच्या आवडीच्या संस्कृत विषयाशी संबंधित अशा वाई येथील प्राज्ञपाठ शाळा मंडळाला २५ लाखांची देणगी दिली. भाग्यश्री या वकील होत्या. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर