शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा;बालगोपाल, ‘बीजीएम’ची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 13:56 IST

के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत अभिनव साळोखे, रोहित कुरणे यांच्या गोलच्या जोरावर बालगोपाल तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा ३-१ असा, तर बी.जी.एम. स्पोर्टसने मंगळवार पेठ फुटबॉल क्लबचा ३-० असा पराभव केला.

ठळक मुद्देके.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा;बालगोपाल, ‘बीजीएम’ची आगेकूचसंयुक्त जुना बुधवार, मंगळवार पेठ पराभूत

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत अभिनव साळोखे, रोहित कुरणे यांच्या गोलच्या जोरावर बालगोपाल तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा ३-१ असा, तर बी.जी.एम. स्पोर्टसने मंगळवार पेठ फुटबॉल क्लबचा ३-० असा पराभव केला.शाहू छत्रपती स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत गुरुवारी बालगोपाल व संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून बालगोपाल संघाचे वर्चस्व राहिले. यात वैभव राऊत, सूरज जाधव, रोहित कुरणे, मनीष मलिक, ऋतुराज पाटील, अभिनव साळोखे यांनी चढाया केल्या.

सातव्या मिनिटास सूरज जाधवच्या पासवर अभिनव साळोखे याने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर सामन्यात बरोबरी साधण्यासाठी जुना बुधवार संघाकडून रिचमोंड, अकील पाटील, सनी शिबू, रोहन कांबळे, सुमित घाटगे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. उलट २१ व्या मिनिटास ‘बालगोपाल’कडून ऋतुराज पाटीलने दिलेल्या पासवर रोहित कुरणे याने गोल करीत संघाची आघाडी २-० ने वाढविली.

दरम्यान, जुना बुधवारकडून सुमित घाटगे याने मारलेला फटका ‘बालगोपाल’चा गोलरक्षक अक्षय कुरणे याने उत्कृष्टरीत्या अडविला. सामन्याच्या ३१ व्या मिनिटास ‘बालगोपाल’कडून अभिनव साळोखेच्या पासवर रोहित कुरणे याने गोल करीत संघाला ३-० अशी भक्कम आघाडी पूर्वार्धातच मिळवून दिली. उत्तरार्धात तीन गोलचे ओझे घेऊन खेळणाऱ्या जुना बुधवारकडून सामन्यात आघाडी कमी करण्यासाठी नियोजनबद्ध खेळी करण्यात आली.

या खेळीस ६९ व्या मिनिटास यश आले. मोठ्या गोलक्षेत्राबाहेरून सनी शिबू याने मारलेल्या फटका ‘बालगोपाल’च्या गोलरक्षकास अडविता आला नाही. त्याच्या हाताला लागून चेंडू गोलजाळ्यात थेट गेला. त्यामुळे सामन्याची स्थिती ३-१ अशी झाली. हीच गोलसंख्या अखेरपर्यंत राहिल्याने सामना ‘बालगोपाल’ने जिंकला.बी.जी.एम. स्पोर्टस व मंगळवार पेठ फुटबॉल क्लब यांच्यात झालेला सामना बी.जी.एम.ने ३-० असा एकतर्फी जिंकला. उत्तरार्धात बी.जी.एम.कडून २० व्या मिनिटास जॉन्सन जोशोने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात बी.जी.एम.कडून ७२ व ८० व्या मिनिटास अभिजित साळोखे याने गोल करीत संघाची आघाडी ३-० अशी भक्कम केली.

‘मंगळवार’कडून आदित्य लाड, शिवम पोवार, यशराज कांबळे यांनी आघाडी कमी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. या उलट बी.जी.एम.कडून सुयश हांडे, विशाल पाटील, ओंकार खोत, जॉन्सन जोशो, अनिकेत मगदूम यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत ३-० या गोलसंख्येवर सामना खिशात घातला.

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर