शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे २ नोव्हेंबरपासून 'इतके' दिवस बंद राहणार, कारण.. 

By पोपट केशव पवार | Updated: October 27, 2023 16:03 IST

उत्पादनाच्या गुणवत्तेची जबाबदारी उत्पादकांची असते

कोल्हापूर : कृषी बी-बियाणांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सध्या असलेले कायदे पुरेसे असताना राज्य सरकारने नवीन कायदे करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. प्रस्तावित कायद्यातील तरतूदी बि-बियाणे, खते विक्रेत्यांसाठी अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे या कायद्यांना विरोध करण्यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाण, किटकनाशके, रासायनिक खते व्यापारी संघटनेच्यावतीने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील दोन हजार कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष विकास कदम व सचिव सागर खाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.राज्य सरकारने विधेयक ४०,४१,४२, ४३ व ४४ नुसार कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांसाठी नवीन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, या कायद्यातील तरतुदी अत्यंत जाचक आहेत. यामुळे विक्री-व्यवसाय करणे अशक्य होईल. त्यामुळे हे कायदे करु नका अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. प्रस्तावित कायद्यातील कृषी निविष्ठा विक्रेता लेबल क्लेमनुसारच विक्री करतो. मात्र, त्याचा वापर कृषी केंद्राच्या नियंत्रण बाहेर असल्याने तो कायदा कृषी विक्रेत्यांना लागू करू नये, प्रस्तावित कायद्यात कृषी निविष्ठाबाबत तक्रार असल्यास शेतकरी कृषी विभाग सोडून पोलीस स्टेशनला तक्रार करू शकणार आहे. मात्र, पोलिस विभागाला कृषी विभाग व कृषी निविष्ठेचे ज्ञान नसल्याने ही तक्रार जुन्या कायद्याप्रमाणे कृषी अधिकाऱ्यांकडेच करावी अशी तरतूद करा, प्रस्तावित कायदा ४३ मध्ये खते दळणवळण कायद्यांतर्गत असल्याने व बी-बियाणे काळाबाजार नियंत्रणाची तरतूद आहे. मात्र, कषी निविष्ठांची उपलब्धता मुबलक प्रमाणात असल्याने हा कायदा कृषी विक्रेत्यांना लागू करू नका, कायदा ४४ मध्ये बोगस निविष्ठा आढळल्यास झोपडपट्टी गुंड, अंमली पदार्थ माफिया व हातभट्टी गुंड या ॲक्टखाली कृषी विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद केली आहे. मात्र, विक्रेते शासनमान्य कंपनीने उत्पादित केलेल्या निविष्ठांची सीलबंद पॅकमध्ये विक्री करतात. उत्पादनाच्या गुणवत्तेची जबाबदारी उत्पादकांची असते. त्यामुळे या कायद्यात कृषी विक्रेत्यांना आरोपी करू नका अशा मागण्या पदाधिकाऱ्यांनी केल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र