शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

‘कोयना एक्सप्रेस’ कऱ्हाडात थांबणार !

By admin | Updated: January 13, 2015 00:12 IST

उद्या तीन तासांचा ‘ब्लॉक’ : मसूर-तारगावदरम्यान रेल्वे फाटकाच्या बोगद्याचे काम

कऱ्हाड : मसूर-तारगाव येथे रेल्वे फाटकाच्या ठिकाणी बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने बुधवारी कोल्हापूरहून मुंबईला जाणारी कोयना एक्सप्रेस कऱ्हाड स्थानकात तीन तास थांबविण्यात येणार आहे. काम आटोपल्यानंतर दुपारी २.२५ वाजता कोयना एक्सप्रेस मुंबईकडे धावणार असल्याची माहिती स्थानकाचे प्रबंधक स्वामी यांनी दिली. कऱ्हाड तालुक्यात ठिकठिकाणी रेल्वे फाटक आहेत. संबंधित फाटकांवर कर्मचारी नसल्याने रेल्वे आल्यानंतर रस्त्यावरील वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. तसेच अपघाताची भीतीही निर्माण होते. मसूर-तारगावदरम्यान असलेल्या फाटकाच्या ठिकाणी बोगदा तयार करणे गरजेचे होते. त्याला मंजुरी मिळाली असून, बुधवारी त्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणारी कोयना एक्सप्रेस ओगलेवाडी रेल्वे स्थानकात थांबविण्यात येणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी २.२५ पर्यंत कोयना एक्सप्रेस स्थानकात थांबेल. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ती मुंबईकडे मार्गस्थ होईल, असे प्रबंधक स्वामी म्हणाले. (प्रतिनिधी)