शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोरगावकर ट्रस्टची वैद्यकीय सेवेची गुढी-अन्नछत्रानंतर आता मोफत औषधोचारही मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 17:09 IST

समाजसेवेचा पिढ्यानपिढ्यांचा वारसा जपणाऱ्या कोरगावकर ट्रस्टने गरजूंना पोटभर खायला अन्न दिल्यानंतर आता रुग्णसेवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देदर सोमवारी शिरोली नाक्यावरील कोरगावकर पेट्रोलपंपावर उपक्रम

कोल्हापूर: समाजसेवेचा पिढ्यानपिढ्यांचा वारसा जपणाऱ्या कोरगावकर ट्रस्टने गरजूंना पोटभर खायला अन्न दिल्यानंतर आता रुग्णसेवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या मोफत वैद्यकीय सेवेची गुढी शिरोली नाक्यावरील कोरगावकर पेट्रोलपंपासमोर उभारली जाणार आहे. गरजूंना तपासणी, उपचार, औषधे मोफत देण्याचा हा उपक्रम दर सोमवारी सकाळी १0 ते दुपारी २ या वेळेत अव्याहतपणे सुरु राहणार आहे.

जगण्यासाठी माणसाला पोटभर अन्न आणि चांगल्या आरोग्यासाठी योग्य औषधोपचार वेळेत आणि तेही रास्त किंमतीत मिळणे महत्वाचे असते, पण अलीकडे या दोन्हीही गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत. याची जाणिव असल्यानेच कोरगावकर ट्रस्टने पेट्रोलपंपावर मोफत अन्नछत्र सुरु केले. या अन्नछत्रात रोज हजारभर माणसे सुग्रास अन्नाचा आस्वाद घेतात. आतापर्यंत एक लाखाहून अधिक जणांनी याचा लाभ घेतला आहे. गरजूंच्या तोंडात अन्नाचा घास घालणाऱ्या या उपक्रमाबरोबरच आता गरजूंसाठी औषधोपचाराची सोय करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. याची सुरुवात शनिवारी गुढी पाडव्यादिवशी होत आहे.

कै. अनंतराव गोंविदराव कोरगावकर ट्रस्टतर्फे शिरोली येथील कोरगाव पेट्रोलपंपावर गेली ६३ वर्षे समाजसेवेचा झरा वाहत आहे. देशातील उच्चांकी पेट्रोल विक्री असणाºया पेट्रोलपंपापैकी एक असणाºया या पंपाच्या निव्वळ नफ्यातील २५ टक्के वाटा दुर्बल घटकांसाठी खर्च करण्याचे धोरण कोरगावकर कुटूंबियांची तिसरी पिढीही तितक्याच आत्मीयतेने जपत आहे. वृध्दाश्रम, अनाथाश्रम, मतिमंद, अंध यांना मदतीसासठी मोफत अ‍ॅम्ब्युलन्स, नैसर्गिक आपत्तीवेळी मदत, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य क्षेत्रांना मदत, वृक्षारोपणासाठी मदत, वारकाऱ्यांची, दुष्काळग्रस्तांना पाणी अशा विविध उपक्रमातून कोरगावकर कुटूंबियांनी आपला सामाजिक जाणिवा प्रगल्भ असल्याची प्रचिती दरवेळी दिली आहे. 

टॅग्स :medicineऔषधंsocial workerसमाजसेवकkolhapurकोल्हापूर