शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

‘आर्किटेक्ट’मध्ये कोराणे पॅनेल विजयी सर्व जागांवर बाजी : शिंदे पॅनेलला पराभवाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:12 IST

विकासाभिमुख कामकाजाची ग्वाही देत सभासदांचा कौल आपल्याकडे वळविणाऱ्या इंजिनिअर्स अजय कोराणे यांच्या पॅनेलने ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् व इंजिनिअर्स कोल्हापूर’च्या निवडणुकीत सर्व १४ जागांवर सोमवारी

ठळक मुद्देआतषबाजी, गुलालाच्या उधळणीने विजयी उमेदवार, समर्थकांचा जल्लोष

कोल्हापूर : विकासाभिमुख कामकाजाची ग्वाही देत सभासदांचा कौल आपल्याकडे वळविणाऱ्या इंजिनिअर्स अजय कोराणे यांच्या पॅनेलने ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् व इंजिनिअर्स कोल्हापूर’च्या निवडणुकीत सर्व १४ जागांवर सोमवारी एकहाती विजय मिळविला. इंजिनिअर्स अतुल शिंदे यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण यांना फाटा देत संयमाने जल्लोष केला.

या असोसिएशनच्या ४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सन २०१८-१९ या कालावधीसाठी वार्षिक निवडणूक झाली. त्यात इंजिनिअर्स अजय कोराणे पॅनेल आणि अतुल शिंदे पॅनेलमध्ये लढत झाली. रेसिडेन्सी क्लब आणि क्रिडाई कोल्हापूर या संस्थांच्या निवडणुकीची राजकीय किनार लाभल्याने निवडणुकीत चुरस रंगली. अधिकार मंडळाचे पाच सदस्य, नऊ संचालक अशा १४ जागांसाठी दोन पॅनेलचे एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.

दोन्ही पॅनेलनी जोरदार प्रचार केला. असोसिएशनच्या निवडणुकीसाठी सोमवारी ४१४ पैकी ३३६ जणांनी मतदान केले. एक मत बाद झाले.विजयी उमेदवार असे (कंसात मिळालेले मतदान) : अध्यक्ष अजय कोराणे (२१०), उपाध्यक्ष विजय चोपदार (२०३), सचिव राज डोंगळे (१८४), सहसचिव अनिल घाटगे (२२२), खजानिस उमेश कुंभार (२०९), संचालक अंजली जाधव (२३०), गौरी चोरगे (२१९), जयंत बेगमपुरे (२१७), उदय निचिते (२१२), प्रशांत पत्की (२१२), विजय रामचंद्र पाटील (२१०), प्रशांत काटे (२०८), प्रमोद पवार (२०२), निशांत पाटील (१९४).कोराणे पॅनेलला आर्किटेक्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत, सुनील पाटील, सूरज जाधव, विजय कोराणे, संजय आवटे, संदीप घाटगे, दिलीप जाधव, ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव, उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, रवीकुमार माने, आदींनी पाठबळ दिले. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ वास्तुविशारद मोहन वायचळ, बलराम महाजन, गणपत व्हटकर, सतीश मिराशी, रमेश पोवार यांनी काम पाहिले. 

शिंदे पॅनेलच्या उमेदवारांची मतेअतुल शिंदे (१२५), सुधीर हंजे (१३१), विजय भांबुरे (१५४), सुनील मांजरेकर (११३), बाजीराव भोसले (१२७), निरंजन वायचळ (१३७), आशुतोष केसकर (१३२), मिलिंद नाईक (१२४), परशराम रेमानिचे (११९), महेश ढवळे (११४), चंद्रकांत घेवारी (११२), सुधीर पाटील (१११), सचिन चव्हाण (११०), विजय धोंडिराम पाटील (१०४).चुरशीने ८१ टक्के मतदानचुरशीच्या वातावरणात निवडणुकीसाठी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच्या मुदतीत ८१ टक्के मतदान झाले. आमदार चंद्रदीप नरके, कुंभी सहकारी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, नगरसेवक विजय सूर्यवंशी आदींनी मतदानाचा हक्क बजावला. स्टेशन रोडवरील असो.च्या कार्यालयाचा परिसर गर्दीने फुलला. मतदान केंद्र परिसरात दोन्ही पॅनेलने बूथ, उमेदवारांची नावे व छायाचित्रे असणारे डिजिटल फलक लावले होते. मतमोजणी सायंकाळी पाच वाजता सुरू झाली. रात्री सव्वाआठ वाजता निकाल जाहीर केला.मित्रत्व, खिलाडूवृत्तीचे दर्शननिकाल जाहीर झाल्यानंतर शिंदे पॅनेलचे प्रमुख अतुल शिंदे आणि त्यांच्या सहकाºयांनी विजयी झालेल्या कोराणे पॅनेलच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. शिंदे यांनी स्वत: पेढे वाटप केले. त्यातून असोसिएशनच्या सभासदांमधील मित्रत्व आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडले.निवडणूक दृष्टिक्षेपातअंजली जाधव यांना सर्वाधिक २३० मतेविजय पाटील यांना सर्वांत कमी १०४ मतेविजयी विद्यमान संचालक :कोराणे, डोंगळे, कुंभार, जाधव.पराभूत विद्यमान संचालक : शिंदे, मांजरेकर, भोसले, चव्हाण, ढवळे, नाईक, पाटील, रेमानिचे.नऊ नव्या चेहºयांना पहिल्यांदाच संधी 

आर्किटेक्ट, इंजिनिअर्स यांचा समतोल साधून पॅनेलची बांधणी केली. विकासाभिमुख कामकाजाची ग्वाही देत आम्ही सभासदांपर्यंत पोहोचलो. त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. माजी अध्यक्ष, ज्येष्ठ सभासदांची सल्लागार समिती स्थापन करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमची वाटचाल राहील.- अजय कोराणेलोकशाही मार्गाने आणि मित्रत्वातून आम्ही निवडणूक लढविली. निवडणुकीत ज्या सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांचे आभार मानतो. सभासदांचा कौल आम्हाला मान्य आहे. असोसिएशनच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे कार्यरत राहू.- अतुल शिंदेकोल्हापुरात सोमवारी इंजिनिअर्स अजय कोराणे यांच्या पॅनेलने ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् व इंजिनिअर्स कोल्हापूर’च्या निवडणुकीत सर्व १४ जागांवर सोमवारी एकहाती विजय मिळविला. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी पॅनेलप्रमुख कोराणे यांना खांद्यावर उचलून घेत आणि विजयी मुद्रा दाखवत जल्लोष केला. यावेळी शेजारी राजेंद्र सावंत, प्रशांत काटे, चेतन चव्हाण, दिलीप जाधव, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक