शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या वालीची बाजी

By admin | Updated: May 11, 2016 00:42 IST

‘यूपीएससी’ : देशात ५८० वा क्रमांक; साताऱ्याचे उदय खोमणे यांचे यश

कोल्हापूर : सहाव्या प्रयत्नात ५८० वा क्रमांक पटकावीत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) कोल्हापूरमधील नागाळा पार्क येथील शीतल महादेव वाली याने मंगळवारी बाजी मारली आहे. बारावीत पहिल्यांदा अनुत्तीर्ण होऊनही केवळ जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश मिळविले आहे. मूळचे गुणवरे (ता. फलटण) येथील असणारे व सध्या कोल्हापुरात सहायक विक्रीकर आयुक्तपदी कार्यरत असणाऱ्या उदय सुदाम खोमणे यांनी ८८५ व्या क्रमांकासह या परीक्षेत यश मिळविले आहे.यूपीएससीची परीक्षा डिसेंबर २०१५ मध्ये झाली. यानंतर मार्च-मे २०१६ दरम्यान घेण्यात आलेल्या वैयक्तिक मुलाखतीमधील यशस्वी उमेदवारांची गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यात मूळचा नेसरी (ता. गडहिंग्लज), पण सध्या नागाळा पार्क येथे राहणाऱ्या शीतल वाली याने ५८० क्रमांक पटकविला. ‘विधी’ विषयातून त्याने हे यश मिळविले आहे. त्याचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण विद्यापीठ हायस्कूलमध्ये, तर मेन राजाराम हायस्कूल अ‍ॅँड ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी विज्ञानपर्यंतचे शिक्षण झाले. यात बारावीत पहिल्यांदा तो अनुत्तीर्ण झाला. यावर खचून न जाता त्याने यूपीएससीच्या परीक्षेत यशस्वी होण्याचे ध्येय बाळगले. त्यानुसार बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने शहाजी लॉ कॉलेजमध्ये विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत यूपीएससीची तयारी सुरू केली. गेल्या सहा वर्षांपासून त्याचा अभ्यास सुरू होता. यात गेल्यावर्षी यूपीएससीच्या परीक्षेत ६१४ व्या क्रमांकाने (रँक) तो उत्तीर्ण झाला; पण रँक वाढावी या जिद्दीने त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला. त्यातून यावर्षी त्याने ५८० व्या क्रमांकाने यश मिळविले. त्याचे वडील महादेव हे राजर्षी शाहू छत्रपती कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापक, तर आई वृषाली या न्यायालयातील निवृत्त कर्मचारी आहेत. त्याचे नीलेश, आकाश, समीर हे तीन भाऊ अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत आहेत. कोल्हापुरात सहायक विक्रीकर आयुक्तपदी कार्यरत असणारे उदय खोमणे हे ८८५ व्या क्रमांकाने या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. राज्यशास्त्र विषयातून त्यांनी परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यांचे शालेय शिक्षण गुणवरे येथे झाले. यानंतर त्यांनी कऱ्हाडमधील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल डिप्लोमा आणि एमआयटी, पुणे येथून बी. ई. मेकॅनिकलची पदवी मिळविली. यानंतर त्यांनी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. यातून त्यांनी विक्रीकर विभागाच्या परीक्षेत यश मिळविले. कोल्हापुरातील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील पाच विद्यार्थ्यांनी मुलाखत दिली. यात बोरीसिंगुरी (जि. नागपूर)मधील विनोदकुमार येरणे याचा समावेश होता. येरणे हा ७०९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.यश अपेक्षित होतेएमपीएससीमधील यशानंतर युपीएससी परीक्षेसाठी प्रयत्न केला. त्यात पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. नोकरीनंतर मिळालेल्या वेळेत अभ्यास केला. युपीएससीसाठी काही महिने कोल्हापुरातील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला, पण याठिकाणी काही मेळ बसेना. मग, सेल्फ स्टडीवर भर दिला. अभ्यासातील सातत्यामुळे यश अपेक्षित होते.-उदय खोमणेकष्टाचे चीज झालेबारावी अनुत्तीर्ण झाल्यानंतर करिअर संपले, असे अनेकांची समजूत असते; पण जिद्दीच्या जोरावर ही समजूत मी खोडून काढल्याचा विशेष आनंद होत आहे. गेल्या सहा वर्षांतील कष्टाचे चीज झाले. माझ्या यशात आई-वडील, भाऊ, मार्गदर्शक दीपा विचारे आदींचा मोठा वाटा आहे. या परीक्षेसाठी दिवसातील आठ ते दहा तास अभ्यास करत होतो. त्यासह स्वयंअध्ययनावर भर दिला. त्यातून यशापर्यंत पोहोचलो.- शीतल वाली जिद्द आणि संयम असेल आणि अभ्यासाचे योग्य तंत्र आत्मसात झाले, तर कोणतेही यश आपण मिळवू शकतो, हा विश्वास असल्याने सहाव्या प्रयत्नात मला यश मिळाले. प्रामाणिकपणे अभ्यास हेच माझ्या यशाचे गमक आहे. - अमोघ थोरात