शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची जागा काँग्रेसचीच : प्रकाश आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:54 IST

कोल्हापूरच्या जागेचा दावा अद्याप कॉँग्रेसने सोडलेला नाही. आमची मागणी प्रदेश कॉँग्रेसकडे प्रलंबित आहे. तरीही कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार आघाडीचा उमेदवार ताकदीने निवडून आणला जाईल, असा विश्वास कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री

ठळक मुद्देआमच्यातील विस्कळीतपणा विरोधकांच्या पथ्यावर; शहाणे होण्याची वेळ आली

कोल्हापूर : कोल्हापूरच्या जागेचा दावा अद्याप कॉँग्रेसने सोडलेला नाही. आमची मागणी प्रदेश कॉँग्रेसकडे प्रलंबित आहे. तरीही कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार आघाडीचा उमेदवार ताकदीने निवडून आणला जाईल, असा विश्वास कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शनिवारी व्यक्त केला. आमच्यातील विस्कळीतपणाच विरोधकांच्या पथ्यावर पडला असून, यामध्ये सगळ्यांचेच नुकसान झाल्याने शहाणे होण्याची वेळ आल्याचा टोलाही त्यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

प्रकाश आवाडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राष्टवादीसोबतच्या आघाडीची अधिकृत घोषणा झालेली नाही. गेल्या वेळेला हातकणंगलेची जागा कॉँग्रेसकडे होती. येथून ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी निवडणूक लढविली होती. ‘स्वाभिमानी’बरोबर आघाडीची चर्चा सुरू असून, ही जागा त्यांना देण्याबाबत प्रदेश कॉँग्रेसकडून आमच्याकडे विचारणा झालेली आहे. कोल्हापूरच्या जागेवरील आमचा दावा अद्याप कायम आहे; पण कोणत्याही परिस्थितीत राज्यातील भाजप सरकारला घरी बसायचे असल्याने दोन्ही कॉँग्रेसची आघाडी मजबूत झाली पाहिजे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेची एक-एक जागा महत्त्वाची असून, कोल्हापुरातील आघाडीचा उमेदवार ताकदीने निवडून आणला जाईल.

आमच्यातील विस्कळीतपणामुळेच भाजप-शिवसेना वाढली. दोन्ही कॉँग्रेस एकदिलाने राहिल्या तर चित्र वेगळे दिसले असते; पण आमचे शत्रू आम्हीच झालो, आता दुरुस्त झाले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी आमदार सतेज पाटील, प्रल्हाद चव्हाण, अ‍ॅड. सुरेश कुराडे, संध्या घोटणे, प्रकाश सातपुते, राहुल आवाडे उपस्थित होते.बूथ कमिट्या सक्षम करण्यावर भर देणारकोल्हापूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस बळकटीकरणाचे अभियान राबविले जाणार असून, पुढील आठवड्यापासून प्रत्येक तालुक्यात जाऊन बूथ कमिट्यांचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शनिवारी दिली.मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभांसह सर्व निवडणुकांतील विजयी व पराभूत कॉँग्रेस उमेदवारांची बैठक आज, रविवारी कॉँग्रेस कमिटीत आयोजित केली आहे. बूथ कमिट्या अधिक सक्षम करून पक्षसंघटना चांगल्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून सामान्य माणसाची दिशाभूल केली असून, शेतीनंतर सर्वांत महत्त्वाच्या असणाऱ्या वस्त्रोद्योग व्यवसायाच्या तोंडाला बजेटमध्ये पाने पुसली आहेत. आधुनिकीकरणाची एकही नवी योजना नाही, प्रत्येक घटकाला लॉलिपॉप दाखविण्याचे काम केल्याची टीका आवाडे यांनी केली. कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘गरिबांसाठी किमान उत्पन्न योजना’ राबविण्याची घोषणा केली आहे. कॉँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून एकाही गरीब व्यक्तीला मूूलभूत गरजांसाठी कोणावरही विसंबून राहावे लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल बुधवारी (दि. ६) कोल्हापूर दौºयावर येत आहेत. सकाळी दहा वाजता कॉँग्रेसच्या कमिटीत मेळावा आयोजित केला आहे.अशोक चव्हाण यांची शनिवारी सभाकोल्हापूर काँग्रेस व इचलकरंजी काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची शनिवारी (दि. ९) सकाळी १० वाजता शहापूर (इचलकरंजी) येथे सभा आयोजित केल्याची माहिती आवाडे यांनी दिली. 

घरवापसी सुरूमागील काळात काहीजण पक्षापासून दुरावले होते. त्या सर्वांना एकत्रित करणार आहे. रुसवेफुगवे कमी करून कॉँग्रेसच्या मजबुतीची मोहीम हातात घेतली आहे. येत्या काही दिवसांत अनेक नेते व कार्यकर्त्यांची घरवापसी सुरू होईल. काहीजण सरकारच्या दबावामुळे थांबल्याचे आवाडे यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर