शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा समृद्ध वारसा सदैव प्रेरणादायी : भूषण गगराणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 18:36 IST

Kolhapurnews, culture, कोल्हापूरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा हा सदैव प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे ब्रँड कोल्हापूरकरांनी याची कायम मनात जाणीव ठेवून कोल्हापूरचा नावलौकिक आणखी वाढविण्यासाठी भविष्यातील वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी केले.

ठळक मुद्देकोल्हापूरचा समृद्ध वारसा सदैव प्रेरणादायी : भूषण गगराणीब्रँड कोल्हापूर समारंभात ९८ जणांचा गौरव

कोल्हापूर : कोल्हापूरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा हा सदैव प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे ब्रँड कोल्हापूरकरांनी याची कायम मनात जाणीव ठेवून कोल्हापूरचा नावलौकिक आणखी वाढविण्यासाठी भविष्यातील वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी केले.शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ब्रँड कोल्हापूर गौरव समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कला, क्रीडा, साहित्य, संशोधन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या ९८ जणांचा गौरव करण्यात आला.गगराणी म्हणाले, स्वत:चे गाव, स्वत:चे अस्तित्व, स्वत:ची संस्कृती ही आपल्यासोबत अदृश्य स्वरूपात असते. माझ्या जडणघडणीत हे गाव नसते, तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो; त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना गावाचा तितकाच वाटा असतो. जगात कुठेही असाल तर कोल्हापूरचे नाव घेतले जाते.

कोल्हापूरला दोन हजार वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलेचा समृद्ध वारसा आहे. आरक्षणाची सुरुवात, चित्रपट निर्मिती, पहिला कॅमेरा आणि देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कोल्हापूरकर होते. त्यामुळे कोल्हापूर हे सुरुवातीपासूनच ब्रँड आहे. येथील साहित्य, कृषी आणि उद्योग क्षेत्र हे प्रेरणा देणारे आहे. ह्यब्रँड कोल्हापूरह्ण असलेल्या सर्वांना कोल्हापूर शहराने दिलेला वारसा याची जाणीव सतत मनात ठेवून ब्रँड कोल्हापूरकरांनी पुढील वाटचाल करावी.पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, आपल्या कोल्हापूरची ओळख ही तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल एवढीच होती. मात्र, येथील रत्नांनी केलेल्या अलौकिक कामगिरीमुळे सर्वत्र नावलौकिक मिळाला आहे. ही रत्ने पुढे आली पाहिजेत. त्यांची जगभरात ओळख झाली पाहिजे.

आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या जगात कोल्हापूरचे ब्रँडिंग आपणच केले पाहिजे. मी कोल्हापूरचा हे सांगायला विसरू नका. यासाठी अग्रेसर असले पाहिजे. नागपूर, औरंगाबाद, पुणे ही तीन शहरे राज्यात विविध क्षेत्रांत अग्रेसर आहेत. खाद्यसंस्कृतीत इंदौर प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे कोल्हापूरही प्रसिद्ध झाले पाहिजे.केवळ कोल्हापुरातच शक्यभूषण गगराणी म्हणाले, मला नेहमी अनेकजण विचारतात, तुम्ही गगराणी आणि मराठी इतकं चांगले कसं बोलता? यावर मी कोल्हापूरचा आहे. आमच्या इथे सगळ्या भाषा मराठीतून बोलल्या जातात; त्यामुळे समोरच्याला वेगळी ओळख सांगायची गरज लागत नाही. मास्कला मॅस्क असे म्हणणारे येथेच भेटतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर