शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 16:15 IST

कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार एस. लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्रातून त्यांची येथे बदली झाली आहे; तर डॉ. सुहास वारके यांची कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे बदली झाली.

ठळक मुद्देकोल्हापूरचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहियागृह विभागाचे आदेश : सुहास वारके यांची मुंबईत बदली

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार एस. लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्रातून त्यांची येथे बदली झाली आहे; तर डॉ. सुहास वारके यांची कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे बदली झाली.भारतीय पोलीस सेवेतील महानिरीक्षक श्रेणीतील दर्जाच्या आधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी राज्याच्या गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले. त्यानुसार या बदल्यांचे आदेश निघाले.कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर डॉ. वारके यांनी गेले वर्षभर काम पाहिले आहे. आता त्यांच्या जागी बदली झालेले मनोजकुमार लोहिया हे मूळचे नांदेडचे असून यापूर्वी त्यांनी मुंबईत अतिरिक्त आयुक्तपदाची, तर पोलीस अधीक्षक मंडळावर मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी पुणे ग्रामीण, परभणी, औरंगाबाद येथेही पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे.याशिवाय दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्य केलेले विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकहून मुंबईत आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेच्या सहआयुक्तपदावर बदली झाली. तसेच यापूर्वी कोल्हापुरात पोलीस अधीक्षकपदावर काम केलेले यशस्वी यादव यांची मुंबई शहर वाहतूक पोलीस आयुक्तालय येथे सहपोलीस आयुक्तपदी बदली झाली.

कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी सेवा बजावलेले प्रताप दिघावकर यांची नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी, तर मिलिंद भारंबे यांची मुंबई शहर पोलीस आयुक्तालयात गुन्हे विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर