शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

कोल्हापूरच्या लालपरीला २४० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

राम मगदूम गडहिंग्लज : कोरोनाच्या महामारीमुळे गतवर्षी अनेक दिवस एस.टी.चे चाक फिरलेच नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ...

राम मगदूम

गडहिंग्लज :

कोरोनाच्या महामारीमुळे गतवर्षी अनेक दिवस एस.टी.चे चाक फिरलेच नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला तब्बल २४० कोटींचा फटका बसला. प्रवासी संख्येत सुमारे १० कोटींनी घट झाल्यामुळे उत्पन्नात ६७ टक्क्यांनी घट झाली.

२०१९-२० मध्ये दररोज ६९९ बसेस एकूण ९ कोटी २१ लाख ५७ हजार किलोमीटर धावल्या. एकूण १३ कोटी ४३ लाख ९४ हजार प्रवाशांची वाहतूक केली. त्यातून ३५६ कोटी ३० लाख २८ हजार उत्पन्न मिळाले होते.

२०२०-२१ मध्ये दररोज ३०० बसेस एकूण ३ कोटी ७५ लाख ६५ हजार किलोमीटर धावल्या. एकूण ३ कोटी ६४ लाख २७ हजार प्रवाशांची वाहतूक केली. त्यातून ११६ कोटी ८७ लाख ९० हजार इतके उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत एकूण किलोमीटरमध्ये ५९ टक्के, तर प्रवासी संख्येत ७२ टक्क्यांनी घट झाली.

-------------------------------

* मालवाहतुकीतून मिळाले २ कोटी ७९ लाख

१ जून ते ३१ मार्चअखेर ७ लाख १ हजार २९४ किलोमीटरच्या मालवाहतुकीतून २ कोटी ७९ लाख ४५ हजारांचे उत्पन्न मिळाले.

-------------------------------

* प्रतिक्रिया

कोल्हापूरच्या प्रवाशांचे एसटीवर खूप प्रेम आहे; परंतु गेल्यावर्षी कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर खूपच मर्यादा आल्या. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसंदर्भातील शासकीय निर्बंध आणि प्रवाशांची मागणी विचारात घेऊन टप्प्याट्प्प्याने वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान टळले. तरीदेखील एकंदरीत प्रवासी संख्या सुमारे १० कोटींनी घटल्यामुळे कोल्हापूर विभागाला मोठा फटका बसला.

- रोहन पलंगे, विभागीय नियंत्रक, कोल्हापूर.

-------------------------------

फोटो ओळी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाची इमारत.

१२०४२०२१-गड-०२

-------------------------------

* सदर बातमीसाठी आकडेवारीचा तक्का (क्यूएसडी) फाईलने (जे यूजर कोलवर - १२ गड फाईल) नावाने पाठविली आहे.