शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

जगात भारी 'आम्ही कोल्हापुरी', KBC'त कविता चावला बनल्या 'करोडपती'

By समीर देशपांडे | Updated: September 17, 2022 18:23 IST

याआधीही त्यांनी एकदा ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये भाग घेतला होता. परंतू त्यात त्यांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली नव्हती.

कोल्हापूर : शहराजवळील गांधीनगरच्या रहिवासी कविता चावला या ‘कौन बनेगा करोडपती’ च्या १४ व्या भागातील पहिल्या करोडपती बनल्या आहेत. बुधवारी संध्याकाळी या कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले असून त्याच्या या यशाची कथा सांगणाऱ्या भागाचे प्रसारण सोमवारी आणि मंगळवारी संध्याकाळी होणार आहे.गांधीनगर येथील विजय चावला हे कापड व्यापारी असून त्यांच्या पत्नी कविता या गृहिणी आहेत. याआधीही त्यांनी एकदा ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये भाग घेतला होता. परंतू त्यात त्यांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली नव्हती. तरीही त्यांनी जिद्द न सोडता पुन्हा या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी तयारी सुरू केली.मुलगा विवेकसोबत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. एका, एका प्रश्नाची उत्तरे बरोबर देत त्यांनी तब्बल एक कोटी रूपयांचे बक्षिस जिंकले आहे. एक कोटी रूपये मिळवून देणाऱ्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. डोळ्यात पाणी उभे राहिले. आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर त्यांनी एकाचवेळी तब्बल एक कोटी रूपयांचे बक्षिस मिळवल्याने त्यांचे यश हे कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे.बच्चनवेड्यांची उपस्थितीया कार्यक्रमाला कोल्हापूरमधून ४० बच्चनवेड्यांनी उपस्थिती दर्शवली होती. कविता यांना एक कोटी रूपयांचे बक्षिस जाहीर होताच या उपस्थित कोल्हापूरच्या बच्चनवेड्यांनी जल्लोष केला. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनीही चावला यांनी कोल्हापूरचे नाव उज्जवल केल्याची भावना व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKaun Banega Crorepatiकौन बनेगा करोडपती