शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

झाले खासदार.. पुढे आले नाहीत वारसदार; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' खासदारांनी घराणेशाहीची परंपरा चालवलीच नाही

By पोपट केशव पवार | Updated: April 30, 2024 15:11 IST

पुढची पिढी राजकारण सोडून इतर व्यवसायात

पोपट पवारकोल्हापूर : साधे ग्रामपंचायतीचे सदस्यपद मिळाले तरी पुढच्या निवडणुकीत आमच्याच घरात हे पद हवे असे सांगत रक्तातील नात्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून घराणेशाहीची परंपरा अखंडित ठेवणाऱ्यांची संख्या राज्याच्या राजकारणात वाढत आहे. मात्र, कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे कधीकाळी लोकप्रतिनिधी असलेल्या बहुतांश माजी खासदारांनी ही घराणेशाहीची परंपरा मतदारसंघात चालवलीच नाही. त्यामुळे खासदारांच्या घरात खासदार, आमदारच होणार हा समज या माजी खासदारांनी चुकीचा ठरवला आहे. परिणामी, त्यांच्या पश्चात मतदारसंघात ना घराणेशाही चालविली ना वारसदार पुढे आणले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या माजी खासदारांचा गौरवपूर्ण उल्लेख होताना कोल्हापूरचे पहिले खासदार बाळासाहेब खर्डेकर, सदानंद डिगे यांच्यापासून ते दाजीबा देसाईंपर्यंत अनेकांचे वारसदार नोकरी, व्यवसायातच स्थिरस्थावर झाल्याचे पाहायला मिळते.

निंबाळकरांचे वारस व्यवसायातचकोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून १९७१ ला काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेल्या राजाराम निंबाळकर यांच्यानंतर त्यांचे वारसदार राजकारणात सक्रिय झाले नाहीत. पूर्वीची राजाराम आणि आताची अयोध्या टॉकीज ही या निंबाळकरांच्या मालकीची. त्यांच्या वारसदारांनी राजकारणाऐवजी व्यवसायालाच अधिक प्राधान्य दिले.दाजीबांचा मुलगा एकीकरण समितीतकोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून १९७७ ला दिल्ली गाठणारे शेकापचे दाजीबा देसाई हे मूळचे बेळगावचे. अखंड महाराष्ट्र असताना त्यांचे गाव चंदगड तालुक्यात होते. देसाई यांचे चिरंजीव दीपक हे सरकारी नोकरदार होते. निवृत्तीनंतर ते महाराष्ट्र एकीकरण समितीत सक्रिय आहेत.

मोरे यांचे कुटुंब राजकारणापासून दूरहातकणंगले लोकसभा मतदारसंघातून १९६२ मध्ये के.एल.मोरे हे काँग्रेसकडून संसदेत पोहोचले. दोनवेळा त्यांना ही संधी मिळाली. राजारामपुरीत वास्तव्य असणारे त्यांचे कुटुंब मात्र राजकारणापासून कोसो दूर आहे. त्यांचा मुलगा, मुलगी हे वैद्यकीय क्षेत्रात आहेत.कदम यांचे वारस पटलावर दिसेनातहातकणंगले लोकसभा मतदारसंघातून १९७१ मध्ये गुलाल लागलेले दत्तात्रय बाबूराव कदम हे मूळचे शिरदवाडचे (ता. शिरोळ) रहिवासी. दत्तुबा या नावाने ते लाेकप्रिय होते. त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब राजकारणात आले नाही. मात्र, अलीकडच्या काळात त्यांचे नातू इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४