शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे अर्थचक्र सुरू, तीन महिन्यांनी रस्ते बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:45 IST

CoronaVirus In Kolhapur : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधाने ठप्प झालेले कोल्हापूर शहराचे अर्थचक्र सोमवारी तीन महिन्यांनंतर प्रथमच व्यापक स्वरूपात सुरू झाले. सर्व व्यवहार, व्यापार, बाजारपेठा पूर्ववत खुल्या झाल्या. प्रचंड आर्थिक संकटात असलेल्या व्यापारी वर्गाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. शहरातील सर्वच व्यवहार नियमितपणे सुरू झाल्याने रस्त्यावर, बाजारपेठातून नागरिकांची तसेच वाहनांची मोठी गर्दी उसळली.

ठळक मुद्देकोल्हापूरचे अर्थचक्र सुरू, तीन महिन्यांनी रस्ते बहरले रस्त्यावर, बाजारपेठातून नागरिकांची तसेच वाहनांची मोठी गर्दी

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधाने ठप्प झालेले कोल्हापूर शहराचे अर्थचक्र सोमवारी तीन महिन्यांनंतर प्रथमच व्यापक स्वरूपात सुरू झाले. सर्व व्यवहार, व्यापार, बाजारपेठा पूर्ववत खुल्या झाल्या. प्रचंड आर्थिक संकटात असलेल्या व्यापारी वर्गाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. शहरातील सर्वच व्यवहार नियमितपणे सुरू झाल्याने रस्त्यावर, बाजारपेठातून नागरिकांची तसेच वाहनांची मोठी गर्दी उसळली.राज्य सरकारच्या सूचनेनुसार तब्बल तीन महिन्यांच्या कालखंडानंतर जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर शहरातील कोरोनाबाबतचे निर्बंध शिथिल करून सरसकट सर्वच दुकाने, व्यवसाय, व्यापार सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे ह्यपुनश्च हरिओमह्ण करण्यास आसुसलेल्या व्यापारी, व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार, फेरीवाले यांनी आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन बंद पडलेला व्यवसाय सुरू केला.शहरातील अनेक दुकानदार सकाळी आठ वाजताच आपापल्या दुकानात पोहचले. तीन महिने बंद असल्यामुळे प्रथम त्यांनी दुकानांची झाडलोट सुरू केली. देव-देवतांच्या फोटोंची पूजा केली आणि बंद पडलेल्या आपल्या व्यवसायाची पुन्हा एकदा सुरवात केली. शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने कोरोनाच्या काळात सुरू होती. सोमवारपासून मात्र सर्वच दुकाने सुरू झाली. कापड, भांडी, ज्वेलरी, इमिटेशन्स, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, लॉन्ड्री, स्टेशनरी, झेरॉक्स सेंटर, साड्या व ड्रेस मटेरियल, चपल, मोबाईल शॉपी, गॅसशेगडी, पानपट्टी, चहाच्या गाड्या अशा शेकडो प्रकारची दुकाने व व्यवसाय सोमवारी सुरू झाले. त्यामुळे ग्राहकांच्या गर्दीने ही दुकाने फुलून गेली. लहान-मोठे मॉल, शोरूमही सुरू झाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर