शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याची जादू कोल्हापूरकरांनी अनेकदा अनुभवली

By संदीप आडनाईक | Updated: December 17, 2024 15:46 IST

उस्तादजींच्या नावाने झालेल्या एका शास्त्रीय संगीत कार्यक्रमाची तिकिटे चक्क काळ्याबाजाराने विकली गेली होती

संदीप आडनाईक कोल्हापूर : तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याची जादू कोल्हापूरकरांनी तब्बल सात ते आठ वेळा अनुभवली होती. सामान्यत: चित्रपटांची तिकिटे काळ्या बाजारात विकली जातात; परंतु शास्त्रीय कार्यक्रमांच्या इतिहासात प्रथमच केशवराव भोसले नाट्यगृहातील उस्तादजींच्या नावाने झालेल्या एका शास्त्रीय संगीत कार्यक्रमाची तिकिटे चक्क काळ्याबाजाराने विकली गेली होती.कोल्हापुरात १९८२, १९९०, १९९५, २००९, २०१०, २०११, २०१२ आणि २०१९ मध्ये झालेल्या कार्यक्रमांना उस्तादांनी हजेरी लावली होती. कधी शिवाजी स्टेडियम, कधी संगीतसूर्य केशवराव भोसले, कधी पद्माराजे हायस्कूलचे मैदान, कधी राम गणेश गडकरी सभागृह, कधी देवल क्लब, रमण मळा, सेंट झेव्हिअर हायस्कूल, हाॅटेल सयाजीमध्ये झालेल्या कार्यक्रमांसाठी कोल्हापूरकर धावले होते. गुणीदास फाउंडेशनचे राजभूषण सहस्रबुद्धे आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.बेळगावहून आले होते टॅक्सीनेसन १९८१ मध्ये इंडियन टोबॅको कंपनीने देवल क्लबसोबतच्या पद्माराजे हायस्कूलच्या मैदानावर भरलेल्या मैफिलीसाठी ते बेळगावहून टॅक्सीने कोल्हापुरात आल्याची आठवण सहस्रबुद्धे यांनी सांगितली. या दरम्यान त्यांच्या घरीच उस्तादजींची प्रत्यक्ष भेट झाल्याचेही ते म्हणाले. १९९० मध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सुरेंद्र मोहिते आयोजित कार्यक्रमात उस्तादजींनी तब्बल २ तास १० मिनिटे तबला वाजवून रसिक श्रोत्यांचे कान तृप्त केले होते. याच कार्यक्रमाची तिकिटे तेव्हा काळ्याबाजारात विकली गेली होती.

लहान मुलांसोबत रमायचे उस्तादगुणीदास फाउंडेशनसोबत उस्तादजींनी चार कार्यक्रम केले. २००९ मध्ये रमणमळा येथे, २०११ मध्ये सेंट झेव्हिअर हायस्कूल, २०१२ मध्ये केशवराव भोसले नाट्यगृह आणि २०१९ मध्ये हॉटेल सयाजी येथे त्यांचे कार्यक्रम झाल्याची आठवण सहस्रबुद्धे यांनी सांगितली. विद्यार्थ्यांसोबत त्यांनी दोन तास तबल्याविषयी संवाद साधला होता. लहान मुलांना शिकवताना ते रमून जात असेही सहस्रबुद्धे म्हणाले.

वडिलांसोबत जुगलबंदीवडील अल्लारखाँ, शंकर महादेवन यांच्यासोबतची उस्तादांची जुगलबंदीही श्रोत्यांनी अनुभवली आहे. १९९० च्या सुमारास शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संगीत रजनी कार्यक्रमात पद्माराजे हायस्कूलच्या मैदानातील कार्यक्रमात वडील अल्लारखाँसोबत त्यांनी जुगलबंदी सादर केली होती. त्यानंतर गायक शंकर महादेवन यांच्यासोबत एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यानंतरही १९९५ च्या सुमारासही शाहू रजनीत ते सहभागी झाले होते. त्यांच्या दिल्ली घराण्याच्या तबल्यासोबत ते नव्या पिढीशीही जुळवून घेत, असे ठाकूरदेसाई यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरZakir Hussainझाकिर हुसैन