शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

कोल्हापूरच्या कुस्तीप्रेमींना यंदा 'महाराष्ट्र केसरी'ची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 11:47 IST

सातारा येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी खुल्या गटातून पृथ्वीराज पाटील, संग्राम पाटील (गादी) तर माती गटातून कौतुक डाफळे, शुभम सिद्धनाळे यांची निवड कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून करण्यात आली आहे.

कोल्हापूर :  सातारा येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी खुल्या गटातून पृथ्वीराज पाटील, संग्राम पाटील (गादी) तर माती गटातून कौतुक डाफळे, शुभम सिद्धनाळे यांची निवड कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून करण्यात आली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करणारे, पण कोल्हापुरातील तालमींमध्ये सराव करणारे सिकंदर खेख, माउली जमदाडे, प्रकाश बनकर, भैरु माने, अक्षय मनगवडे, सुनील खेचाळ हेही दावेदार आहेत. त्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापुरात येण्याची आशा कुस्तीप्रेमींतून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आतापर्यंत कोल्हापुरातील दादु चाैगुले (१९७०,१९७१), लक्ष्मण वडार ( १९७२, १९७३), युवराज पाटील (१९७४), नामदेव मोळे (१९८४), विष्णू जोशीलकर (१९८५), विनोद चौगुले (२०००) यांच्यानंतर आजपर्यंत कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा आणता आलेली नाही. सद्यस्थितीत कोल्हापूर संघातून पृथ्वीराज पाटील (देवठाण व सध्या आर्मी), संग्राम पाटील (आमशी, सध्या आर्मी) दोघेही गादी गटातून, तर माती गटातून कौतुक डाफळे (कागल), महान भारत केसरी (कर्नाटक) शुभम सिद्धनाळे (इचलकरंजी) हे आपले कसब महाराष्ट्र केसरी किताबासाठी पणाला लावणार आहेत. यांच्याकडून मोठ्या अपेक्षा कोल्हापुरातील तमाम कुस्ती प्रेमींना आहेत.

हेही कोल्हापूरकरच ..

  • जिल्हा संघातून निवडलेल्या चौघांशिवाय सिकंदर शेख (वाशिम), माउली जमदाडे (सोलापूर), प्रकाश बनकर(मुंबई उपनगर), , भैरू माने (गोंदीया) शाहू विजयी गंगावेश तालमीतून वस्ताद विश्वास हारूगले यांचेकडून तंत्रशुद्ध कुस्तीचे मार्गदर्शन घेत आहेत. तर अक्षय मनगवडे (सोलापूर), सुनील खेचाळ (सोलापूर) हे दोघे राष्ट्रकुल सुवर्ण विजेते राम सारंग यांच्याकडून कुस्तीचे धडे घेत आहेत. हे जरी बाहेरच्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी आतापर्यंतची प्रशिक्षण कोल्हापुरातच घेत आहेत.
  • महाराष्ट्र केसरीत दिग्गज समजले जाणारे विजय चौधरी, अभिजीत कटके आदी मल्ल जखमी आहेत. केवळ खुल्या गटात केवळ सातारच्या घरचा मल्ल म्हणून किरण भगतच दावेदार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्याच; परंतु विविध जिल्ह्यातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या या मल्लाकडून कुस्तीप्रेमींना मोठ्या आशा आहेत.

जिल्हा संघातून पृथ्वीराज, संग्राम, कौतुक, शुभम यांच्याकडून कुस्तीप्रेमींना मोठ्या आशा आहेत. तर अन्य गटातही कोल्हापूरचे मल्ल दावेदार ठरतील. - प्रकाश खोत, उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ 

जिल्हा संघातून निवडलेल्या मल्लांबरोबर इतर जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करणारे मल्लांचे बहुतांशी आयुष्य कोल्हापूरच्या मातीतच प्रशिक्षण घेण्यात गेले आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा कोल्हापुरात येणार आहे. आम्हाला विजयी उमेदवाराची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची निश्चितच संधी मिळेल. - संग्राम कांबळे, प्रवक्ते, कुस्ती मल्ल विद्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्ती