शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

'दोन गोष्टी चंद्रकांत पाटील यांची पाठ आयुष्यभर सोडणार नाहीत!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 21:37 IST

कागलचे नूतन आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापूरकरांचा केलेला अपमान आणि एक लाख साड्या वाटप या दोन गोष्टी ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पाठ सोडणार नाहीत, असा इशारा देत आगामी निवडणुकांमध्ये या अपमानाचे उत्तर कोल्हापूरकर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कागलचे नूतन आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘लोकमत’च्यावतीने संपादक वसंत भोसले यांनी मुश्रीफ यांचे स्वागत केले. यावेळी कुरुकलीचे माजी सरपंच विकास पाटील, गोरंबेचे माजी सरपंच शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते. 

यावेळी मुश्रीफ म्हणाले, विधानसभेच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी ‘आमचं काय चुकलं’ अशी कोल्हापूरकरांना विचारणा केली. एवढेच नव्हे, तर कोल्हापूरकरांना अपमानास्पद वागणूक दिली, त्याबद्दल कोणीतरी बोलणे गरजेचे होते. कोल्हापूरकरांचा केलेला अपमान व एक लाख साड्या वाटप या दोन गोष्टी पाटील यांच्या मागे आयुष्यभर लागणार आहेत. त्यांना लोकांची नस माहीत नाही, लोकशाहीमध्ये आंदोलन, मोर्चे काढण्याचा सर्वांना अधिकार आहे, ते त्यांना आवडत नाही.

‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे ७०० ठराव सत्तारूढ गटाला दिल्याने सत्ता राखता आली; पण त्यानंतर ते विसरले. त्यांना आमची किंमत कळली नाही. आता एका विशिष्ट वळणावर पी. एन. पाटील यांच्यासह आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. मल्टिस्टेटबाबत आपण त्यांच्याशी बोललो होतो, हे खरे आहे. आगामी निवडणुकीबाबतही त्यांच्याशी चर्चा करू, असे मुश्रीफ यांनी सांगितले.- महापालिकेत दोन्ही काँग्रेसला राजेश क्षीरसागर यांनी साथ दिली; पण विधानसभेतील भूमिकेमुळे ते नाराज असल्याबाबत विचारले असता, ते नसतानाही आमचे बहुमत होते. याबाबत आपण व सतेज पाटील बसून लवकरच निर्णय घेऊ, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

- ‘भाजप’ने कुपेकर घराण्याला शेवटपर्यंत झुलवत ठेवल्याने त्यांची तळ्यात-मळ्यात भूमिका राहिली. संध्यादेवी कुपेकर किंवा नंदिनी बाभूळकर यापैकी कोणीही उभे राहावे, अशी आमची इच्छा होती. आम्ही शेवटपर्यंत त्यांची वाट पाहिल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :LokmatलोकमतHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील