शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ओवीसाठी कोल्हापूरकरांनी दातृत्व दाखविले, एसएसपीई या दुर्मीळ आजाराने ग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:03 IST

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील सागर पुजारी यांच्या ओवी या मुलीला एसएसपीई (सबएक्यूट स्क्लेरोसिंग पैनेंसेफलाइटिस) हा एक दुर्मीळ आणि गंभीर ...

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील सागर पुजारी यांच्या ओवी या मुलीला एसएसपीई (सबएक्यूट स्क्लेरोसिंग पैनेंसेफलाइटिस) हा एक दुर्मीळ आणि गंभीर स्वरूपाचा आजार झाला आहे. सात वर्षाच्या मुलीला या आजाराने जखडले असून तिच्यावर होणारे उपचारही खर्चिक आहेत. सागर पुजारी यांनी लेकीसाठी परदेशातून उपचारासाठी लागणारे इंजेक्शन आणले. ओवीवर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करताच कोल्हापूरच्या नागरिकांनी ओवीच्या उपचारासाठी अर्थसाहाय्य करण्यास सढळ हाताने सुरुवात केली आहे.कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांनी पुजारी कुटुंबीयांसाठी धावून जात मदतीचा हात पुढे केला आहे. पुजारी कुटुंबीयांना सर्वच स्तरातून आर्थिक मदत केली जात आहे. विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांनी ओवीच्या आजाराची माहिती समजताच तिला पंचवीस हजार रुपयांची तत्काळ मदत जाहीर केली आहे. ओवीच्या उपचारासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत असून पन्नास हजारहून अधिक मदत करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधीमार्फत एक लाख रुपयांचा निधीही ओवीच्या उपचारासाठी मंजूर झाला आहे. मुलीच्या दुर्मीळ आजाराच्या उपचारासाठी होणारा भरमसाट खर्च पाहता पुजारी कुटुंबीयांना कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा मोठा आधार मिळतो आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल