शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

जगभरात प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलला ‘जीआय’ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:51 AM

कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलांना ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक मानांकन’ प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. परिणामी, जगभरात कोल्हापुरी चपलाची शान वाढली आहे.

ठळक मुद्देकर्नाटकाच्याही समावेशाबद्दल नाराजी; केंद्र, राज्य शासनाचा निषेध

कोल्हापूर : कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलांना ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक मानांकन’ प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. परिणामी, जगभरात कोल्हापुरी चपलाची शान वाढली आहे. आतापर्यंत देशभरातील ३२६ उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून, महाराष्टतील ३२ उत्पादनांचा यात समावेश आहे. यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापुरी गूळ आणि कोल्हापुरी चप्पल ही दोन उत्पादने आहेत.

गेल्या आठ-दहा वर्षांपासून कोल्हापुरी चपलांना ‘जीआय’ मानांकन मिळावे यासाठी कोल्हापुरातील चर्मकार समाजाच्यावतीने प्रयत्न सुरू होते. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता; पण जीआय मानांकनात शासनाने कोल्हापूरसह कर्नाटकातील जिल्ह्यांचा समावेश केल्याने कोल्हापुरातील चर्मकार समाजाकडून नाराजीचा सूर उमटत आहे. कर्नाटकात बनविणाऱ्या चपला या दर्जाहीन आणि बनावट असल्याच्या प्रतिक्रिया कोल्हापुरातील व्यावसायिकांतून उमटत आहेत.

याबाबत कोल्हापुरातील संत रोहिदास चर्मोद्योग आणि कोल्हापूर चप्पल औद्योगिक समूहाने (क्लस्टर), चर्मोद्योग विकास महामंडळाने नाराजी व्यक्त करून केंद्र आणि राज्य शासनांचा निषेध नोंदविला आहे. महाराष्टÑातील कोल्हापूरसह कर्नाटकातील अथणी भागात तयार केल्या जाणाºया चपलांनाच मानांकन देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्णांत तयार होणाºया चपलांना कोल्हापुरी चप्पल ही ओळख प्राप्त होणार नाही. त्यामुळे कोल्हापुरी चपलाच्या नावाने सुरू असलेला बनावट धंदा कमी होण्यास मदत होणार आहे.कोल्हापूर जिल्ह्णाचा खरा हक्क असलेल्या या चपलाच्या बाजारात कालांतराने कर्नाटकानेही शिरकाव केला आहे. त्यानुसार त्यांनीही भौगोलिक मानांकनासाठी मागणी केली होती.उच्च न्यायालयात तक्रार करणारकोल्हापुरी चपलावर ‘जीआय’ मानांकनाचा फक्त कोल्हापूरचा हक्क असल्याने कर्नाटकातही ‘जीआय’ मानांकनाचा प्रस्ताव मंजूर करणाºया केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवून या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे कोल्हापुरी चप्पल औद्योेगिक समूहाचे संचालक भूपाल शेटे यांनी सांगितले.कोल्हापूरची शानकोल्हापूर जिल्ह्याची शान म्हणून कोल्हापुरी चपलाला जगभरात मान आहे. राजर्षी शाहू महाराजांनीही हा कोल्हापूरची विशेष कला असलेला व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी चर्मकार समाजाला मदत केली होती. त्यामुळे कोल्हापुरात अनेक जणांनी कोल्हापुरी चपला बनविण्याची खासियत आजही जपली आहे.

कोल्हापुरी चप्पलचे मानांकन आठ जिल्ह्यांनामहाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील तसेच कर्नाटकातील धारवाड, बेळगाव, बागलकोट आणि विजापूर या जिल्ह्यांत बनविण्यात येणाºया कोल्हापुरी चपलला ‘जीआय’ मानांकन देण्यात आले आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील व कर्नाटकातील या जिल्ह्यांचा समावेश केल्याने केंद्र व राज्य शासनाचा कोल्हापुरातील चर्मकार व्यावसायिकांनी निषेध केला आहे. 

‘कोल्हापुरी चप्पल’ ही फक्त कोल्हापुरातच बनते. कर्नाटकातील धारवाड, बागलकोट, बेळगाव, विजापूर व इतर ठिकाणी कोल्हापूरच्या नावावर बनावट चप्पला तयार होतात. त्यांनी कोल्हापुरी चपलांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कर्नाटकातील कोल्हापुरी चपलांना जीआय मानांकन देणे म्हणजे कोल्हापूरच्या चप्पल कारागिरांवर अन्याय होणार आहे.- भूपाल शेटे (उपमहापौर), संचालक, कोल्हापुरी चप्पल औद्योगिक समूह (क्लस्टर). 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार