शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा डाळीचा ‘कोल्हापुरी चटका’

By admin | Updated: May 12, 2014 00:27 IST

सचिन भोसले; कोल्हापूर सध्या हरभरा डाळीची मोठ्या प्रमाणात आवक होण्याचे दिवस आहेत. रोज ९० टन हरभरा डाळीची विक्री होते.

सचिन भोसले; कोल्हापूर सध्या हरभरा डाळीची मोठ्या प्रमाणात आवक होण्याचे दिवस आहेत. रोज ९० टन हरभरा डाळीची विक्री होते. यामध्ये तयार हरभरे वेगळे केले जातात. द्विबीज प्रकारातील या डाळीला सुटे करण्याचे काम फ्लोअर मिलमधून केले जाते. याकरिता नेहमीच्या फ्लोअर मिलऐवजी खास हरभरा डाळीसाठी वेगळी यंत्रणा असणार्‍या यंत्रसामग्रीचा वापर केला जातो. प्रामुख्याने त्यातून मोठी, चांगल्या प्रकारची डाळ म्हणून रजवाडी व लहान, कमी दर्जाची म्हणून चालू हरभरा डाळ अशी दोनच प्रकारची डाळ बाजारात उपलब्ध आहे. कोल्हापुरात रजवाडी हरभरा डाळीला मोठी मागणी आहे. इंदोर (मध्य प्रदेश) लातूर, उस्मानाबाद, उदगीर, गुलबर्गा, बार्शी, सोलापूर, आदी भागांतून मोठ्या प्रमाणात हरभरा डाळ राज्याच्या बहुतेक भागांत विक्रीसाठी येते. हरभर्‍याच्या अखंड शेंगेचे रूपांतर डाळीत करण्यासाठी ती फ्लोअर मिलमध्ये ती आणली जाते. तेथूनच बहुतांश राज्यांतील विविध जिल्ह्यांत हरभरा डाळ प्रतवारीप्रमाणे विकली जाते. हरभरा डाळ शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते. त्याचबरोबर तीन प्रकारची जीवनसत्त्वे या डाळीत आहेत. हरभरा डाळीचा अतिवापर शरीरामध्ये पित्त वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे अतिवापर वर्ज्य करावा, असा सल्ला डॉक्टर देतात. महाराष्ट्रात हरभरा डाळीच्या पिठाचा वापर प्रामुख्याने पुरणपोळी, आमटी, भाजी, भजी, वडे, बेसन लाडू, आदींमध्ये केला जातो. केवळ हरभरा डाळीचा कोल्हापुरी ‘चटका’साठी उपयोग करतात, तर वर्षाचे तिखट सांडगे करण्यासाठीही तिचा वापर केला जातो. हरभरा डाळीमध्ये... (१०० ग्रॅम) ४ऊर्जा - ६८६ किलो कॅलरीज ४साखर - २७.४२ ग्रॅम ४तंतुमय पदार्थ- ४.८ ग्रॅम ४फॅट- १.१५६ ग्रॅम ४प्रोटीन- ८.८६ ग्रॅम ४जीवनसत्त्वे- ४ गॅ्रम ४लोह- २.८९ ग्रॅम ४मॅग्नेशियम- ४८ मिलिग्रॅम ४फॉस्फरस- १६८ मिलिग्रॅम ४पोटॅशियम- २९१ मिलिग्रॅम ४सोडियम- ७ मिलिग्रॅम ४झिंक- १.५३ मिलिग्रॅम ४पाणी- ६०.२१ ग्रॅम प्रथम तुर्की या देशात मिळालेले हे वाण आहे. भारतीय बाजारपेठेत लहान, काळे कवच असलेले वाण पिकते. याचबरोबर भारतीय बाजारपेठेत ‘बॉम्बे’ नावाचे काळ्या कवचाच्या हरभर्‍याचे वाणही विकसित झाले आहे. युरोप आणि अफगाणिस्थान येथे काबुली वाण पिकते. बॉम्बे व काबुली चणे म्हणूनही ही जात प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात हरभरा डाळीचे पीक घेणारा देश म्हणून भारताचा अव्वल क्रमांक लागतो. याखालोखाल पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया, तुर्की, म्यानमार, इथिओपिया व इराण येथेही हे पीक घेतले जाते.