शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कोल्हापुरातील दिग्दर्शक अजय कुरणे यांचा ‘बलुतं’ ‘इफ्फी’मध्ये, मराठीतील अवघ्या दोनच लघुपटांचे होणार प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 7:46 PM

गडहिंग्लजच्या शांताबाई यादव या महिला नाभिकाच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘बलुतं’ या मराठी लघुपटाचे प्रदर्शन सोमवार (दि. २०)पासून गोव्यात सुरू होणाऱ्या  ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) होणार आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लजच्या शांताबाई यादवांचा जीवनपट उलगडणार जगभरातील प्रेक्षकांसमोरइंडियन पॅनोरमा विभागात लघुपटांमध्ये ‘बलुतं’चा समावेश

संदीप आडनाईककोल्हापूर : गडहिंग्लजच्या शांताबाई यादव या महिला नाभिकाच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘बलुतं’  या मराठी लघुपटाचे प्रदर्शन सोमवार (दि. २०)पासून गोव्यात सुरू होणाºया ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) होणार आहे.कोल्हापूरचे युवा दिग्दर्शक अजय कुरणे यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून, लोकप्रिय अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी या लघुपटाची पटकथा लिहिली आहे. विशेष म्हणजे गोव्यात दाखविण्यात येणाऱ्या  चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात समाविष्ट असलेल्या अवघ्या दोनच मराठी लघुपटांमध्ये बलुतंचा समावेश आहे.गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दजेर्दार कथावस्तू असलेले ९ मराठी चित्रपट इंडियन पॅनोरमा विभागात यावर्षी दाखविण्यात येत आहेत. यंदा सर्वाधिक २६ मराठी चित्रपट शर्यतीत होते. शुक्रवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार ‘बलुतं’  हा लघुपट प्रदर्शन २१ नोव्हेंबर रोजी आयनॉक्स टू स्क्रीनवर सायंकाळी ५.४५ वाजता दाखविण्यात येणार आहे.

प्रादेशिक विभागातर्फे मराठी भाषेतील अवघे दोनच लघुपट या महोत्सवात जगभरातील प्रेक्षकांसमोर दाखविण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे युवा दिग्दर्शक अजय कुरणे यांच्या ‘बलुतं’ या लघुपटाचा यात समावेश आहे.याशिवाय रोहन कानवडे यांचा ‘खिडकी’  हा लघुपटही या महोत्सवात दाखविण्यात येणार आहे. ‘बलुतं’  या लघुपटातून गडहिंग्लज येथील शांताबाई यादव या महिला नाभिकाच्या आयुष्यावर कुरणे यांनी प्रकाशझोत टाकला आहे. पुरुष नाभिकांच्या अधिकारक्षेत्रात जगण्यासाठी महिला नाभिक असलेल्या शांताबाइंनी आपला अधिकार कसा मिळविला, याचे चित्रण या छोटेखानी लघुपटात आहे.

पदार्पणातच १६ पुरस्कारकोल्हापुरात वास्तव्य करणाऱ्या  अजय कुरणे यांनी यापूर्वी विविध मालिका आणि चित्रपटांचे स्वतंत्रपणे दिग्दर्शन केले आहे. तुज्यात जीव रंगला, क्राइम पेट्रोलसारख्या मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. २०१६ मध्ये तयार केलेल्या ‘बलुतं’  या लघुपटाला विविध १६ पुरस्कार मिळालेले आहेत.यामध्ये उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट लघुपट, उत्कृष्ट छायाचित्रण, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट सिनेमॅटोेग्राफी या पुरस्कारांचा समावेश आहे. हा लघुपट आतापर्यंत हरियाणा, इंदापूर, नागपूर, पुणे, मुंबई, शेगाव, कोल्हापूर, छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, सांगली, एपीजे अब्दुल कलाम फेस्टिव्हल, डॉन बास्को यूथ फिल्म फेस्टिव्हल, रामभाऊ चव्हाण शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल यासारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत दाखविण्यात आला आहे.नवखे कलाकारया लघुपटात तनुजा कदम, आर्या कुरणे यांच्यासह सर्व नवख्या कलाकारांनी काम केले आहे. निरिूल चुरी-कविता चुरी यांची निर्मिती असून लघुपटाची पटकथा लोकप्रिय अभिनेता स्वप्निल राजशेखर यांची आहे. या लघुपटात प्रत्यक्ष शांताबाई यादव यांनीही त्यांचीच छोटीशी भूमिका केली आहे.

टॅग्स :IFFI Goa 2017इफ्फी गोवा 2017kolhapurकोल्हापूर