संदीप आडनाईककोल्हापूर : गडहिंग्लजच्या शांताबाई यादव या महिला नाभिकाच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘बलुतं’ या मराठी लघुपटाचे प्रदर्शन सोमवार (दि. २०)पासून गोव्यात सुरू होणाºया ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) होणार आहे.कोल्हापूरचे युवा दिग्दर्शक अजय कुरणे यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून, लोकप्रिय अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी या लघुपटाची पटकथा लिहिली आहे. विशेष म्हणजे गोव्यात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात समाविष्ट असलेल्या अवघ्या दोनच मराठी लघुपटांमध्ये बलुतंचा समावेश आहे.गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दजेर्दार कथावस्तू असलेले ९ मराठी चित्रपट इंडियन पॅनोरमा विभागात यावर्षी दाखविण्यात येत आहेत. यंदा सर्वाधिक २६ मराठी चित्रपट शर्यतीत होते. शुक्रवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार ‘बलुतं’ हा लघुपट प्रदर्शन २१ नोव्हेंबर रोजी आयनॉक्स टू स्क्रीनवर सायंकाळी ५.४५ वाजता दाखविण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील दिग्दर्शक अजय कुरणे यांचा ‘बलुतं’ ‘इफ्फी’मध्ये, मराठीतील अवघ्या दोनच लघुपटांचे होणार प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 20:47 IST
गडहिंग्लजच्या शांताबाई यादव या महिला नाभिकाच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘बलुतं’ या मराठी लघुपटाचे प्रदर्शन सोमवार (दि. २०)पासून गोव्यात सुरू होणाऱ्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) होणार आहे.
कोल्हापुरातील दिग्दर्शक अजय कुरणे यांचा ‘बलुतं’ ‘इफ्फी’मध्ये, मराठीतील अवघ्या दोनच लघुपटांचे होणार प्रदर्शन
ठळक मुद्देगडहिंग्लजच्या शांताबाई यादवांचा जीवनपट उलगडणार जगभरातील प्रेक्षकांसमोरइंडियन पॅनोरमा विभागात लघुपटांमध्ये ‘बलुतं’चा समावेश