शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांना संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेची पर्वणी, महाराष्ट्रासह सहा संघांचा सहभाग 

By सचिन भोसले | Updated: September 27, 2023 16:31 IST

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन - विफाच्या माध्यमातून कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर १३ ऑक्टोबर पासून राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा ७७ ...

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन - विफाच्या माध्यमातून कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर १३ ऑक्टोबर पासून राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा ७७ व्या संतोष ट्रॉफीतील एफ गटातील एकूण १५ सामने होणार आहेत. यात यजमान महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, त्रिपुरा या संघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरातील स्थानिक फुटबॉल पटूना महाराष्ट्र संघाकडून खेळण्याची अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे.मागील वर्षी याच मैदानावर संतोष ट्रॉफी तील काही सामने के.एस. ए. ने आयोजित केले होते. त्यात महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल संघ अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. सलग दुसऱ्या वर्षी ही संधी विफा चे उपाध्यक्ष व  ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन चे अर्थ समितीचे उपाध्यक्ष मालोजीराजे यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूरला मिळाले आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर १३ ते २२ ऑक्टोंबर दरम्यान ग्रुप एफ मधील १५ सामने होणार आहेत. १३ ऑक्टोबर पहिल्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता महाराष्ट्र विरुद्ध अंदमान निकोबार, त्यानंतर १५ ऑक्टोबर ला सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्र विरुद्ध लक्षद्वीप यांच्यात सामना होणार आहे. सतरा ऑक्टोबर ला दुपारी ३.३० वाजता. आंध्र प्रदेश बरोबर होणार आहे. वीस ऑक्टोबर ला सकाळी ११.३० वाजता. त्रिपुराविरुद्ध, तर २२ ऑक्टोबर ला दुपारी ३.३० वाजता. तेलंगणा सोबत अखेरची लढत होणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल सामने पाहाण्याची फुटबॉल प्रेमींना यामुळे पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.

कोल्हापूरच्या या खेळाडूंना संधी अधिककोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू निखिल कदम, करण चव्हाण- बंदरे, अरबाज पेंढारी, ऋतुराज संकपाळ, ऋतुराज सूर्यवंशी,  संकेत साळुंखे, प्रथमेश हे, प्रतीक बदामे,विशाल पाटील, राज अली यासह अन्य दोन असे बारा खेळाडूंमधून जास्तीत जास्त स्थानिक खेळाडूंना महाराष्ट्र संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. छत्रपती शाहू स्टेडियम हे होमटाऊन असल्याने  या खेळाडूंना आपली कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल