कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत यंदा ‘अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद’ म्हणून राज्यात सलग दुसऱ्यांदा कोल्हापूर जिल्हा परिषदेने (झेडपी) ‘नंबर वन’ मिळविला. ग्रामपंचायत गटातून उत्तूर (ता. आजरा) ग्रामपंचायतीने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला. ग्रामविकास विभागाने शासन आदेश काढून हा निकाल मंगळवारी जाहीर केला.केंद्र सरकारने पंचायत राज व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी २००५-०६ या वर्षापासून विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरांवर ‘यशवंत पंचायत राज अभियान’ ही पुरस्कार योजना सुरू केली. या योजनेतून प्रत्येक वर्षी पंचायत राज संस्थांमधून उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले जाते. प्रशासकीय व्यवस्थापन, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पूर्ण केलेले भौतिक व आर्थिक उद्दिष्ट, लेखापरीक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपासणी केली जाते. विभागीय स्तरावर क्रमांक मिळविलेल्यांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड होते. २०१५-१६ या वर्षासाठी राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेचे ८ फेब्रुवारीला मूल्यमापन करण्यात आले होते. दरम्यान, प्रथम क्रमांक मिळाल्याने जिल्हा परिषदेस २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तिसरा क्रमांक आलेल्या उत्तूर ग्रामपंचायतीस तीन लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. मुंबई येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी दि. २० मार्चला जाहीर कार्यक्रमात बक्षीस वितरण केले जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह सर्व सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांच्याय मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख आणि सर्वच खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे. (वार्ताहर)शवंत पंचायत राज अभियानाचा निकाल जाहीरसर्व पदाधिकारी, सदस्य, अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्याने जिल्हा परिषद दुसऱ्यांदा ‘नंबर वन’ बनल्यामुळे जिल्हा परिषदेचा राज्यात नावलौकिक वाढला आहे.- विमल पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषदसुरुवातीपासूनच नियोजनबद्ध काम केले. सर्वांच्या सहकार्याने ५० हून अधिक निकष पूर्ण केल्याने सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. पुढील वर्षीही पहिला क्रमांक मिळवू आणि हॅट्ट्रिक करू.- अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारीकेंद्रीय स्पर्धेसाठी पात्रकोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिला क्रमांक मिळवून केंद्रस्तरावरील उत्कृष्ट कामगिरीचे पारितोषिक स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. गेल्या वर्षी केंद्राचेही पारितोषिक मिळाले होते.
कोल्हापूर ‘झेडपी’ नंबर वन
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST